नवी दिल्ली, 09 मे : आपल्या देशाशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला पूर्ण माहिती नाही. पण भारताशी संबंधित या आश्चर्यकारक बाबी देशाचा अभिमानच वाढवतात. हिमालयापासून ते निलगिरी पर्वतरांगांपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत, आज भारताचं नाव अनेक विशेष गोष्टींमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्हाला माहिती आहे का, की भारतात असे एक ठिकाण आहे (Place in India where Indian map is visible) जिथे भारताचा नकाशा दिसतो? भारतामध्ये असे एक ठिकाण आहे, जिथं भौगोलिक दृश्य भारताच्या नकाशासारखं (Indian map in Assam) दिसतं. हे ठिकाण आसाममध्ये असून येथे दोन नद्यांचा संगम होतो. हे आहे आसाममधील बोंगाईगाव शहर (Bongaigaon, Assam). ब्रह्मपुत्रा नदी आणि चंपावती नदी या शहराजवळ मिळते (ज्या ठिकाणी चंपावती नदी ब्रह्मपुत्रेला मिळते) या संगमाच्या ठिकाणी असलेला भूभाग अगदी भारताच्या नकाशासारखा दिसतो.
WOW!
— Erik Solheim (@ErikSolheim) November 27, 2021
In Bongaigaon, Assam, there is a place where river Champawati meets Brahmaputra.
It looks just like the map of India 🇮🇳.
Incredible India! pic.twitter.com/Ydr6IJ2Qp7
आसाममध्ये भारताचा नकाशा दिसतो बोंगाईगाव हे आसाममधील एक शहर आहे, जे गुवाहाटीपासून 180 किमी अंतरावर आहे. बागेश्वरी मंदिर, रॉक कट गुहा इत्यादी अनेक प्रसिद्ध गोष्टी आहेत. पण या सगळ्या गोष्टींमधली खास गोष्ट म्हणजे भारताचा नकाशा दिसणारं ठिकाण. ब्रह्मपुत्रा नदी आणि चंपावती नदी या शहराजवळ मिळते (place where river Champawati meets Brahmaputra) या संगमाच्या ठिकाणी असलेला भूभाग अगदी भारताच्या नकाशासारखा दिसतो. या भागाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला खालचा भाग भारतीय द्वीपकल्पासारखा दिसतो. जमिनीच्या वर जे पर्वत दिसतात, तो भाग हिमालयासारखा दिसतो. फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ग्रीनबेल्ट आणि रोड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष एरिक सोल्हेम यांनी गेल्या वर्षी त्यांच्या ट्विटरवर हा फोटो शेअर केले होता, ज्याने लोकांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी अतुल्य भारताचे कौतुक केले. एका व्यक्तीने पोस्टवर लिहिले की, भारतीय असूनही आम्हाला आमच्या भारताशी संबंधित अशा गोष्टींची माहिती नाही. भारतातील लोक पाश्चिमात्य देशांपेक्षा जास्त उत्साही आहेत. एकाने सांगितले की हे अतुल्य भारताचे दृश्य आहे. परंतु, हा भाग लवकरच पुरात वाहून जाईल. बहुतेक लोकांनी फोटो सुंदर असल्याचं म्हटलंय.