भोपाळ 14 जून : मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील द्वारकापुरी भागात पिझ्झा चेनमध्ये काम करणाऱ्या तरुणीला रस्त्यावर मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्याकडे पाहत असल्याचा आरोप करत चार तरुणींनी बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे (Pizza Chain Employee Thrashed By 4 Women).. तिच्या तक्रारीवरून चारही तरुणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षातील महिलेच्या मांडीवरुन रस्त्यावर पडला चिमुकला; मागून वेगात आली बस अन्…, थरारक घटनेचा Live Video हे प्रकरण इंदूरच्या द्वारकापुरी भागातील आहे. जिथे पिंकी आणि तिच्या टोळीची दहशत आहे. व्हिडिओमध्ये चार आरोपी तरुणी पीडित मुलीला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करताना दिसत आहेत. मारहाणीनंतर पीडित तरुणी रस्त्यावर पडली आणि लोकांकडे मदत मागत राहिली. मात्र तिच्या मदतीसाठी कोणीही आलं नाही. नंतर समोरच्या एका घरात जाऊन तिने आपला जीव वाचवला.
ही घटना शनिवारची असून याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या लेडी गँगने मारहाणीचा व्हिडिओ स्वतःच बनवून व्हायरल केला आहे. स्थानिक पोलीस अधिकारी सतीश द्विवेदी यांनी सांगितलं की, पीडित नंदनी यादवच्या तक्रारीवरून पिंकी आणि तिच्या तीन मैत्रिणींविरोधात मारहाणीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. VIDEO: नवरदेवाने लग्नाच्या स्टेजवरच नवरीला लगावली चापट; कारण वाचून येईल संताप पीडित तरुणीने सांगितलं की ती फूड कंपनी डॉमिनोजमध्ये काम करते. शनिवारी ती कामावर जाणार होती. इतक्यात पिंकी आणि तिच्या तीन मैत्रिणींनी येऊन तिचा रस्ता अडवला. यानंतर बोलण्यास सांगून जवळ बोलावून लाथा-बुक्क्यांनी तिला मारहाण केली. तू आमच्याकडे का बघत होतीस, असा सवाल करुन त्यांनी पीडितेला मारहाण केली.