जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Pitbull Dog Attack On Cow : पिटबुल डॉगने आता गायीलाही बनवली शिकार; श्वानाच्या भयंकर हल्ल्याचा VIDEO

Pitbull Dog Attack On Cow : पिटबुल डॉगने आता गायीलाही बनवली शिकार; श्वानाच्या भयंकर हल्ल्याचा VIDEO

पिटबुल डॉगचा गायीवर हल्ला

पिटबुल डॉगचा गायीवर हल्ला

खतरनाक पिटबुल डॉगने माणसांनंतर आता गायीवरही भयंकर हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 23 सप्टेंबर : गेले काही दिवस कुत्र्याच्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. विशेषतः पिटबुग डॉगने सर्वत्र दहशत निर्माण केली आहे. एका महिलेचा जीव घेणाऱ्या या पिटबुल प्रजातीच्या श्वानांनी त्यानंतर कित्येक माणसांवर हल्ला केल्याची प्रकरणं समोर आली. आता तर जगातील खतरनाक कुत्र्यां पैकी एक असलेल्या पिटबुलने माणसांनंतर गायीलाही आपली शिकार बनवली आहे. पिटबुलने गायीवरही भयंकर हल्ला केला आहे. या हल्ल्याचा भयानक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये पिटबुल डॉगने एका गायीवर हल्ला केला आहे. सरसैया घाटावर कुत्र्याने गायीला धरलं. गाय कुत्र्याच्यापासून आपली सुटका करण्यासाठी धडपडत होती. गायीला कुत्र्यापासून सोडवण्यासाठी माणसांनी बरेच प्रयत्न केले. पण मारूनही किती तरी वेळ कुत्रा गायीला सोडत नव्हता. हे वाचा -  Pitbull सारख्या खतरनाक Dog Attack मध्ये कसा वाचवाल स्वतःचा जीव; पाहा हा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कुत्र्याने गायीच्या तोंडालाच चावा घेतला आहे. तिचं तोंड आपल्या जबड्यात घट्ट धरलं आहे. काही लोक गायीला कुत्र्याच्या जबड्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतात. आधी हाताने मारून, खेचून बघतात पण काहीच फरक पडत नाही. शेवटी काठींनी मारू लागतात. काठीने इतके वार करूनही कुत्रा काही गायीला सोडायला तयार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

अखेर पाण्यात गेल्यावर गायीच्या कुत्र्याच्या तावडीतून कशीबशी सुटका होते. गाय तिथून पळ काढते आणि दूर निघून जाते. तर एक व्यक्ती कुत्र्याला आपल्याच हातात धरून ठेवते.

जाहिरात

@shubhankrmishra ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. लोक या घाटावर जायला घाबरत असल्याचंही या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. किती खतरनाक आहेत पिटबुल? पिट बुल कुत्रे हे सामान्य कुत्र्यांपेक्षा बलवान कुत्रे मानले जातात. त्यांच्याकडे खूप सक्रिय, शक्तिशाली आणि मजबूत जबडा आहे. धाडसी, निर्भय आणि लढाऊ कुत्रे म्हणून त्यांची ख्याती आहे. जगात अनेक ठिकाणी ते डॉगफाइटिंग खेळासाठी उपयुक्त मानले जातात, अमेरिकेसारख्या देशात डॉगफाइटिंगवर बंदी आल्यानंतरही या खेळाचे आयोजन केलं जातं. त्यात पिट डॉग ही पहिली पसंती आहे. हे वाचा -  क्रूरतेचा कळस! माणसाचं श्वानासोबत संतापजनक कृत्य; Shocking Video पिट बुलची प्रतिमा आक्रमक आणि अप्रत्याशित कुत्रा म्हणून अधिक लोकप्रिय आहे. अनेक देशांमध्ये पिट बुल डॉगवर बंदी आहे हेही खरे आहे. या देशांमध्ये इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, न्यूझीलंड, इस्रायल, मलेशिया इ. याशिवाय बेल्जियम, जपान, जर्मनी, चीन, ब्राझीलच्या काही भागात निर्बंध आहेत. या देशांमध्ये पिट बुलचे संगोपन, व्यापार, प्रजनन यावर बंधने घालण्यात आली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात