मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ओमकारच्या आत्मविश्वासाचा साक्षीदार झाला 'रायगड', पुण्याच्या पठ्ठ्यानं चक्क 'एका पायावर' सर केला गड!

ओमकारच्या आत्मविश्वासाचा साक्षीदार झाला 'रायगड', पुण्याच्या पठ्ठ्यानं चक्क 'एका पायावर' सर केला गड!

ओमकार लकडे

ओमकार लकडे

म्हणतात ना जिद्दी पुढे आकाशही ठेंगणं पडतं, ओमकार लकडेनं हे करून दाखवलंय... चक्क एका पायावर या पठ्ठ्यानं 'रायगड' सर केलाय. तोही फक्त एका पायावर! पाहा...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

पुणे, 24 जानेवारी : म्हणतात ना जिद्दी पुढे आकाशही ठेंगणं पडतं, ओमकार लकडे या मुलानं हे करून दाखवलंय. त्याच्या जिद्दीने थेट रायगडाची उंची गाठलीय. चक्क एका पायावर पठ्ठ्यानं रायगड सर केलाय आहे. याचीच चर्चा सध्या सर्वत्र पहायला मिळत असून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

ओमकार लकडे हा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्या निकेतन शाळेत सहाव्या वर्गात शिकतो. लहानपणी एका अपघातात ओमकारला आपला एक पाय पूर्णतः गमवावा लागला. त्यानंतरचं आयुष्य तो कुबडीच्या आधारे जगतोय. पण आपल्या कमतरतेवर रडत न बसता त्याने लढायचं ठरवलं. शाळेच्या प्रत्येक स्पर्धेत तो भाग घेतो. त्याच्या याच आत्मविश्वासाचा साक्षीदार झालाय चक्क 'रायगड'.

दोन दिवसांपूर्वी ओमकरच्या शाळेची सहल रायगडावर निघाली. ओमकारही सहलीत सहभागी झाला आणि बघता बघता अगदी चपळतेनं त्यानं रायगड सर केला. विचार करा... सुमारे 1435 पाया-या आणि त्याही फक्त एका पायावर! थकवा नव्हता की मनात हार मानन्याचा थोडासाही विचार. होती ती फक्त जिद्द, आत्मविश्वास. ज्याच्या जोरावर ओमकार रायगडाच्या अवघड चढणीही सहज चढत गेला. केवळ काठीचा आधार घेत एका पायाने गड चढणाऱ्या ओमकारला पाहून पर्यटकही थबकले. त्याच्या या सहासाचं आता सर्वत्र कौतुक होतंय.

ओमकारला काही होणार तर नाही ना? तो थकणार तर नाही ना? अशी चिंता त्याच्या शिक्षकांना लागून होती. मात्र ओमकारने त्याची जिद्द दाखवत गड सर केला. त्याला पाहून बाकीच्या विद्यार्थ्यांनाही अजून प्रोत्साहन मिळत होतं. शिवाजी महाराजांचा जयघोष करत ओमकारने रायगड सर केला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक 11 वर्षाच्या ओमकारवर कौतुकांची थाप देत आहेत.

अशाच जिद्दीमुळे कदाचित म्हटलं जात असावं...कौन कहता है कि आसमाँ में सुराख़ नहीं हो सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारों..! एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों...! ओमकारची ही जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतेय.

First published:

Tags: Pimpari chinchavad, Pune, Raigad, Top trending, Viral, Viral news