जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दुसऱ्या महिलेच्या प्रेमात वेडा होऊन नवऱ्याने सोडलं; बायकोने घेतला खतरनाक बदला

दुसऱ्या महिलेच्या प्रेमात वेडा होऊन नवऱ्याने सोडलं; बायकोने घेतला खतरनाक बदला

दुसऱ्या महिलेच्या प्रेमात वेडा होऊन नवऱ्याने सोडलं; बायकोने घेतला खतरनाक बदला

नवऱ्याने फसवणूक करताच त्याच्यासाठी अश्रू ढाळत बसली नाही तर तिने चांगलीच अद्दल घडवली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मनिला, 01 एप्रिल : काही लोकांचे विवाहबाह्य संबंध असतात. हे समोर येताच कपलमध्ये वाद होतात आणि मग नातं तुटण्यापर्यंत प्रकरण पोहोचतं. नातं तुटल्यानंतर एक व्यक्ती आपल्या नव्या जोडीदारासोबत आयुष्याची नवी सुरुवात करत असते. पण त्याच वेळी दुसरी व्यक्ती मात्र दुःखात, रडत आयुष्य घालवते. पण एक महिला मात्र तिच्या नवऱ्याने तिची फसवणूक करताच त्यासाठी अश्रू ढाळत बसली नाही तर तिने त्याचा खतरनाक बदला घेतला (Wife Revenge On Cheater Husband). फिलीपाइन्समध्ये राहणारी जॅमिली मार्गरिटा गाल्वेजच्या पतीने तिला दुसऱ्या महिलेसाठी सोडलं. यानंतर जॅमिलीही कोलमडली. तिला नवऱ्याचा खूप राग येतो. पण त्याने नातं तोडण्याचंच ठरवलं तर ती काहीच करू शकत नव्हती. पण तिने नवऱ्याला धडा शिकवण्याचं ठरवलं (Relationship News) . तिने नवऱ्यासोबत नातं तुटल्यानंतर त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जे केलं ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. तिने असं काही केलं ज्याचा विचार आपण कुणीही केला आहे. हे वाचा -  VIDEO - भररस्त्यात BF ला मारत होती GF, पाहताच भडकला डिलीव्हरी बॉय; तरुणीसोबत धक्कादायक कृत्य घरी जाऊन तिने सर्वात आधी आपलं फेसबुक अकाऊंट ओपन केलं आणि फेसबुकवर ती लाइव्ह आली. जॅमिलीच्या नवऱ्याला ब्रँडड वस्तूंची आवड होती. त्याच्याकडे महागड्या कपड्यांपासून बुटांपर्यंतचं कलेक्शन होतं. तिने त्याच्या सर्व महागड्या वस्तू बाहेर काढल्या आणि फेसबुक लाइव्हवर ती एकएक करून विकू लागली.

यात शर्ट्स, कॅप्स आणि शूझचा समावेश होता. हे सामान खरेदी करण्याआधी सावधान. हे शापित आहे, असं कॅप्शनही तिने या व्हिडीओला दिलं होतं. फिलीपाइन्स मीडियाच्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ फेसबुकवरून हटवण्यात आला आहे. पण तिच्या युट्यूब चॅनलेवर हा व्हिडीओ आहे. जो व्हायरल होतो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात