मराठी बातम्या /बातम्या /Viral /Petrol-Diesel किमतींचा वीज कर्मचाऱ्याला झटका; गाडी सोडून घोड्यावरुन करावं लागतंय हे काम

Petrol-Diesel किमतींचा वीज कर्मचाऱ्याला झटका; गाडी सोडून घोड्यावरुन करावं लागतंय हे काम

 पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. या किमतीबाबत रोज काही ना काहीतरी चर्चा होताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकांनी आपली वाहने चालवण्यावर मर्यादा आणल्या आहेत. तर काहींनी याकरता शक्कल लढवली आहे

पुढे वाचा ...

शिवहर, 2 एप्रिल: पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. या किमतीबाबत रोज काही ना काहीतरी चर्चा होताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकांनी आपली वाहने चालवण्यावर मर्यादा आणल्या आहेत. तर काहींनी पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांसाठी पर्याय शोधून तो प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली आहे. बिहारमध्ये (Bihar News Update) पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे विद्युत विभागाचा (Electricity Department) एक कर्मचारी यामुळे इतका त्रस्त झाला की, त्याला आपली गाडी सोडावी लागली. शिवहर जिल्ह्यातील अभिजीत तिवारीने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे खिशाला चाप बसल्याने मोटारसायकल चालवणे सोडून दिले आहे. आता त्यांचे काम वीजबिल गोळा करण्याचे असल्याने पर्याय म्हणून त्यांनी वाहतुकीचा नवीन मार्ग स्वीकारला.

अभिजीत तिवारी मोटारसायकलऐवजी घोड्यावर स्वार होऊन ग्राहकांकडून वीजबिल वसूल करतात. मोटारसायकलपेक्षा घोडा अनेक अर्थांनी चांगला आहे, असे त्यांचे मत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि बाइकची देखभाल यापेक्षा घोडेपालन अधिक किफायतशीर आहे, असे ते मानतात. मोटारसायकलची किंमत घोड्यापेक्षा दुप्पट होती, असे शाहपूरचे रहिवासी अभिजीत तिवारी यांचे मत आहे. जेव्हा बाइकच्या खर्चामुळे घरचे बजेट कोलमडू लागले तेव्हा त्यांनी घोडा वापरण्याचा निर्णय घेतला. अभिजीत जेव्हा विजेचे बिल जमा करण्यासाठी घोड्यावरुन जातात तेव्हा ते लोकांच्या कुतूहलाचा विषय बनतात. लोकांना देखील हे पटले आहे की हा प्रकार महागाईमुळे झाला आहे.

हे वाचा-‘विनाधर्म, विनाजात प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी महिलेची हायकोर्टात धाव; सांगितलं कारण

अशाप्रकारे घोड्याचा वापर करून कामावर जाणारे अभिजीत पहिलेच नाहीत. याआधी महाराष्ट्रातही असा प्रकार घडला आहे. खिशाला पेट्रोल परवडेना म्हणून औरंगाबादचा एक तरुण प्रवासासाठी घोडा वापरत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या तरुणाचे शेख युसूफ असे आहे. तो औरंगाबाद शहरातील असून पेट्रोलचे वाढते दर परवडत नसल्याने कामावर जाण्यासाठी त्याने घोडा खरेदी केला.

“मी कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करतो आणि आजही मी प्रवासासाठी माझा घोडा वापरतो.यामुळे मी तंदुरुस्त आणि निरोगी असतो” त्यांच्या म्हणण्यानुसार, इंधनाच्या वाढत्या किमती पाहता, वाहतुकीचे साधन म्हणून घोडा हा उत्तम पर्याय आहे. असे शेख युसूफने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol Diesel hike, Petrol price hike