मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हल्लेखोराचा चावा घेत वाचवला मालकिणीचा जीव; पाहा 'star' कुत्र्याची कामगिरी

हल्लेखोराचा चावा घेत वाचवला मालकिणीचा जीव; पाहा 'star' कुत्र्याची कामगिरी

 तिच्या गळ्यावर चाकू लावला. त्यावेळी स्टारने त्या माणसाच्या तावडीतून सुटत त्याच्या पायाला चावा घेतला.

तिच्या गळ्यावर चाकू लावला. त्यावेळी स्टारने त्या माणसाच्या तावडीतून सुटत त्याच्या पायाला चावा घेतला.

तिच्या गळ्यावर चाकू लावला. त्यावेळी स्टारने त्या माणसाच्या तावडीतून सुटत त्याच्या पायाला चावा घेतला.

मुंबई 16 एप्रिल: असं म्हणतात, की प्राण्यांना आपण जीव लावला तर ते आपल्यासाठी एकवेळ जीवही देतील. प्राण्यांचे आणि माणसांचे भावनिक संबंध सांगणाऱ्या बऱ्याच बातम्या आपल्या ऐकण्यात येतात. श्वान आणि माणसाचं एक नातं फार जिव्हाळ्याचं असतं. अनेक लोक घरी कुत्रा पाळतात. कुत्र्याला माणसाचा एक खरा आणि इमानदार मित्र मानलं जातं. कुत्रा घरात राहून किंवा घराच्या ओसरीत राहून घराची राखण करतो. आणि वेळ पडल्यास घरातील माणसांचा जीवही वाचवतो. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने मालकिणीवर हल्ला केल्यानंतर कुत्र्याने त्याचा चावा घेत आपल्या मालकिणीचा जीव वाचवला.

तर झालं असं की, अ‍ॅमी एडमसन नावाची महिला आपला कुत्रा' स्टार'सह साऊथ-ऑन-सी परिसरात फिरायला गेली होती. स्टार हास्टाफोर्डशायर बुल टेरियर,जॅक रसेल आणि पिटबुल या तीन प्रजातींचा संमिश्रब्रीड आहे. (Staffordshire bull terrier cross Jack Russell cross Pitbull) .तर,अ‌ॅमी फिरत असताना एक जण तिच्याजवळ आला आणि तिला पत्ताविचारला. अॅमी त्याला रस्ता दाखवण्यासाठी वळली असता त्या व्यक्तीने उडी घेततिला पकडून खाली पाडले आणि तिच्या गळ्यावर चाकू लावला. त्यावेळी स्टारने त्या माणसाच्या तावडीतून सुटत त्याच्या पायाला चावा घेतला.

स्टारने त्या माणसाला अडवून ठेवलं. मी स्टारला तुला सोडायला सांगेन, मात्र त्यासाठी मला जाऊ द्यावं लागेल असं त्या महिलेनं हल्ले खोराला सांगितलं. यावर त्या व्यक्तीने तिला सोडून दिलं. मग महिलेनेही स्टारला मागे घेतलं आणि दोघेही आपल्या घरी परतले.

ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अॅमीच्या घराजवळच घडली. यावेळी अ‌ॅमी आणि स्टार हे दोघे फिरून घराकडे परत येत होते. साऊथ चर्चचा पत्ताविचारण्याच्या बहाण्याने हल्ला करणाऱ्या व्यक्तीपासून आपल्या मालकिणीचाबचाव केल्याबद्दल स्टारला त्या रात्री चांगलीच मेजवानी मिळाली. डेली मेलनेयाबाबत वृत्त दिले आहे.

डेली मेलशी बोलताना अॅमी म्हणाल्या,कीत्या व्यक्तीने हल्ला केल्यानंतर मला आपल्या प्राणांची भीती तर होतीच.मात्र आपल्याला मारल्यास आपल्या 9 वर्षाच्या मुलाचं काय होईल याची काळजीमला जास्त वाटत होती. मात्र,स्टारने तिचा जीव वाचवला,त्याबद्दल त्यांनीकृतज्ञता व्यक्त केली. "स्टार हा अगदीच प्रेमळ कुत्रा आहे. सहसा तोसर्वांसोबतच भरपूर खेळतो. त्यामुळे त्याचं असं रौद्ररुप पाहणं माझ्यासाठीआश्चर्याचा धक्का होता." असेही अ‌ॅमी यावेळी म्हणाल्या.

First published:

Tags: Crime news, Dog, Viral