मुंबई, 14 फेब्रुवारी: कोणालाही जीव लावल्यावर माणसं धोका देतील पण मुके प्राणी नाही हे आपल्यापैकी प्रत्येकानेच कधी ना कधी अनुभवलं असेलच. घरी असलेल्या पाळीव प्राण्यांना जितका जीव आपण लावू तितके तीही आपल्या जीव लावतात आपल्यावर प्रेम करायला सुरुवात करतात. असंच काही दृश्य तामिळनाडूमध्ये बघायला मिळालं. आपल्या लाडक्या मालकिणीला सासरी जाताना बघतना कुत्राही इमोशनल झाला आणि तिला न जाण्याची विनंती करू लागला. तुम्हीही बघा व्हिडीओ. या भयाण बीचवर रात्री जो गेला..तो परत आलाच नाही; मध्यरात्री अचानक येतात किंचाळण्याचे आवाज; भीतीने उडेल थरकाप मुक्या प्राण्यांना जरी आपल्यासारखं बोलता येत नसेल तरी त्यांच्यातही भावना असतात आणि विचार करण्याची क्षमता असते. त्यात कुत्रा हा नेहमीच माणसांच्या जवळचा आणि त्यांच्या जिव्हाळ्याचा प्राणी आहे. नेहमीच माणसांची आणि कुत्र्यांची मैत्री आणि त्यांचे किस्से आपण ऐकले आहेत. असाच एक व्हिडीओ तामिळनाडू राज्यात घडला आहे. कुठे दिसते विचित्र महिला तर कुठे शीर नसलेला माणूस; मध्यरात्रीच्या वेळी राज्यातील या रस्त्यांवर फिरतो मृत्यू जीव लावणं याला म्हणतात घरातील मुलगी सासरी चाललीय असं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. मात्र घराच्या बाहेर येताच घरातील पाळीव कुत्र्यानं तिला घट्ट ओठी मारली. इतकंच नाही तर हा कुत्रा तिचा पदर खेचून तिला जणू सांगतोय की, “नको जाऊ आम्हाला सोडून…” हा भावनिक व्हिडीओ कन्याकुमारीचा असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. नवरीही त्याला सोडून जाण्यास तयार नाहीये.
हिमालयातील या सरोवरात आहेत शेकडो मानवी सांगाडे; जिथे जाण्यास आजही आहे बंदी; घडतात रहस्यमय घटना हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. माणूस आणि पाळीव प्राण्यामधील या प्रेमाला बघून नेटकरीही थक्क झाले आहेत. नेहमी कोणावर भुंकणारा आणि चावणरा समजल्या जाणाऱ्या कुत्र्याला असं इमोशनल होताना बघून अनेक जणांच्या डोळ्यांतून अश्रू आले नसतील तर नवलंच.