मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मोडका हात, डोक्याला बँडेज आणि जोरदार डान्स! VIDEO होतोय व्हायरल

मोडका हात, डोक्याला बँडेज आणि जोरदार डान्स! VIDEO होतोय व्हायरल

हात मोडलेली, डोक्याला (Person dancing with bandage and stick in hand goes viral on social media) पट्ट्या लावलेली आणि जर्जर अवस्थेतील व्यक्ती डान्स करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: हात मोडलेली, डोक्याला (Person dancing with bandage and stick in hand goes viral on social media) पट्ट्या लावलेली आणि जर्जर अवस्थेतील व्यक्ती डान्स करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियात (Various viral videos) सध्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ खळखळून हसवणारे असतात, तर काही व्हिडिओ हे ज्ञानात भर घालणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल (Shocking and humourous) मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सुरुवातीला धक्का बसतो, मात्र सत्य परिस्थिती लक्षात आल्यावर मात्र चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटते.

पेशंटच्या वेषात नृत्य

व्हिडिओत नृत्य करणारी व्यक्ती ही जणू काही हॉस्पिटलच्या बेडवरून उठून थेट समारंभात आली असावी, असं वाटतं. या लग्न समारंभात अनेक पुरुष आणि महिला डान्स करत असल्याचं दिसतं. लग्नाचा आनंद लुटत प्रत्येकजण आपल्या तालावर थिरकत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेतो तो पेशंटच्या वेषातील वऱ्हाडी. हातात काठी घेऊन आणि दुसरा हात बँडेजमध्ये लटकवून तो जोरदार डान्स करत आहे. हॉस्पिटलमधील इमर्जन्सी वॉर्डमधून उठून जणू काही थेट लग्नात पोहोचला असावा, असा संशय येण्याइतपत हुबेहूब रुग्णाचा वेष त्यानं परिधान केला आहे.

हे वाचा-लसीकरणाचे विरोधक भरवतात COVID पार्टी, कोरोना रुग्णांना मारतात मिठ्या

गळ्यात ग्लुकोज, पण फुल्ल जोश

पेशंटच्या गळ्यात ज्याप्रमाणं ग्लुकोजची बाटली असते, तशीच या व्यक्तीनंही गळ्यात बाटली लटकावली आहे. त्याच्या डान्समधला जोश हा याच बाटलीतील द्रव्य पिऊन आला की काय, असा प्रश्न हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना पडतो. या व्यक्तीचा पेहराव आणि त्याची डान्स करण्याची पद्धत पाहून त्याच्या आजूबाजूचेदेखील आश्चर्यचकित होतात आणि स्वतःचा डान्स थांबवून त्याच्याकडेच पाहत राहतात. सोशल मीडियात हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्यावर चित्रविचित्र कमेंट्सही येत आहेत. या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी ‘न्यूज 18 लोकमत’ करत नसून व्हायरल व्हिडिओ केवळ समोर आणत आहोत.

First published:

Tags: Dance video, Video viral