• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: रस्ता ओलांडत होता हत्तींचा कळप; नागरिकांनी खोड काढताच भडकले गजराज आणि मग...

VIDEO: रस्ता ओलांडत होता हत्तींचा कळप; नागरिकांनी खोड काढताच भडकले गजराज आणि मग...

हत्ती हा अतिशय बुद्धिमान आणि जीव लावणारा प्राणी आहे, मात्र हत्ती बिथरला तर अतिशय धोकादायक ठरू शकतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 जुलै: मुके प्राणी (Animals) स्वतःहून कधीही माणसांना त्रास देत नाहीत. त्यांना आपल्याला धोका आहे असं वाटतं तेव्हाच ते स्वसंरक्षणासाठी हल्ला करतात; हे माहीत असूनही निष्पाप प्राण्यांना विनाकारण त्रास देण्यात लोक आघाडीवर असतात. अशा त्रास देण्यानं बिथरलेल्या प्राण्यानं हल्ला केला आणि त्यात एखाद्याचा जीव गेला तर दोष मात्र त्या प्राण्यालाच दिला जातो. लोकांच्या अशाच बेफिकीर वागण्यानं एका निरपराध तरुणाचा (Young Boy) हत्तीच्या (Elephant) पायाखाली जीव गेला आणि हत्ती मात्र लोकांच्या रोषाचं कारण ठरला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हत्ती हा अतिशय बुद्धिमान आणि जीव लावणारा प्राणी आहे, मात्र हत्ती बिथरला तर अतिशय धोकादायक ठरू शकतो. या व्हिडीओत लोकांचं बेजबाबदार वागणं या शांत प्राण्याला कसं बिथरवतं आणि एखाद्याच्या मृत्यूला कारण ठरतं हे स्पष्ट दिसतं. 25 जुलै रोजी आसाममधील (Assam) गोलाघाट जिल्ह्यातील (Golaghat) महामार्ग क्रमांक 39 वर (NH39) ही घटना घडली आहे. वन अधिकारी प्रवीण कसवान (IFS Pravin Kasawan) यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. लाईव्ह हिन्दुस्थान डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. नवरी जोमात नवरदेव कोमात! लाजणं राहिलं दूर नववधूने मंडपातच ऐटीत तोंडातून सोडला धूर या व्हिडीओत हत्तींचा एक कळप (Herd of Elephant) शांतपणे रस्ता पार करताना दिसत आहे. त्याचवेळी रस्त्याच्यामधून तो कळप जात असताना दोन्ही बाजूंना लोकांनी (People) गर्दी (crowd) केली असून, हत्तींना चिडवण्यासाठी लोक दंगा करत असल्याचं दिसत आहे. लोक ओरडत आहेत, कोणी एक पिशवी हलवून हत्तींच लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे, तर कोणी मोटरसायकलचा हॉर्न वाजवत असल्याचं दिसत आहे. याकडे दुर्लक्ष करून हत्ती शांतपणे रस्ता पार करत असतानाच, कळपातील एक हत्ती मात्र या सगळ्या दंग्यामुळे बिथरला आणि त्यानं लोकांकडे आपला मोर्चा वळवत त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. मग मात्र सगळ्यांची एकच पळापळ झाली. तेवढ्यात एक तरुण रस्त्याकडेला पडला आणि हत्तीनं त्याच्यावर हल्ला करत त्याला तुडवलं. मग तो हत्ती आपल्या वाटेनं निघून गेला. जबर जखमी झालेल्या या तरुणाला गोलाघाट शासकीय हॉस्पिटलमध्ये (Golaghat Civil Hospital) दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हा व्हिडीओ शेअर करणारे वन अधिकारी प्रवीण कसवान यांनी यासोबत, एका माणसाचा जीव गेला यासाठी नेमकं दोषी कोण आहे? असा मार्मिक प्रश्न केला आहे. लोकांनी यातून तरी धडा घ्यावा आणि मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
  First published: