जाहिरात
मराठी बातम्या / Viral / असं ठिकाण जिथं मृत्यूची भीक मागतात लोक; विजेचा शॉक देऊन केला जातो छळ, अत्याचार वाचूनच थरकाप उडेल

असं ठिकाण जिथं मृत्यूची भीक मागतात लोक; विजेचा शॉक देऊन केला जातो छळ, अत्याचार वाचूनच थरकाप उडेल

रशियातील तुरुंगात  युक्रेनच्या कैद्यांवर होतात अत्याचार (प्रतिकात्मक फोटो)

रशियातील तुरुंगात युक्रेनच्या कैद्यांवर होतात अत्याचार (प्रतिकात्मक फोटो)

हा इलेक्ट्रिक चार्ज तुमच्या शरीरातील प्रत्येक स्नायूत पोहोचतो आणि त्याचा स्फोट होतो आणि मग तुमचे स्नायू आकुंचन पावू लागतात, असं वाटतं.

  • -MIN READ Trending Desk Delhi
  • Last Updated :

    मुंबई 29 मे : गेल्या दीड वर्षापासून युक्रेन आणि रशियादरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या युद्धादरम्यान घडलेल्या अनेक भयावह घटना हळूहळू जगासमोर येत आहेत. रशियातील एक कारागृह नेहमीच तिथल्या भीतीदायक वातावरणासाठी चर्चेत असते. युक्रेन-रशिया युद्धादरम्यान या कारागृहाची जोरदार चर्चा सुरू आहे. या कारागृहात युक्रेनियन नागरिकांना ठेवलं जात असून त्यांचा छळ केला जात आहे. या कारागृहात राहिलेल्या काही कैद्यांनी तेथील भीषण वातावरण आणि छळ करण्याच्या पद्धतींबद्दल सांगितलं आहे. या विषयी सविस्तर जाणून घेऊया. `आज तक`ने याबाबतचे वृत्त दिलं आहे. युक्रेन आणि रशियादरम्यान 24 फेब्रुवारी 2022 पासून युद्ध सुरू आहे. रशियाने पूर्व युक्रेनमधील अनेक भागांवर कब्जा मिळवला आहे. 2014 मध्ये क्रिमिया भाग गमावलेल्या युक्रेनला आता रशियाकडून क्रिमिया तर सोडाच पण इतर प्रदेश परत मिळवणं कठीण झालं आहे. पश्चिमी देशांकडून मिळत असलेल्या शस्त्रास्त्र आणि आर्थिक मदतीच्या जोरावर युक्रेन रशिया विरुद्ध अजूनही संघर्ष करत आहे. रशियन प्रतिनिधीचा आगाऊपणा, युक्रेनच्या खासदाराने दिला चोप; पाहा VIDEO युक्रेनला नाटोमध्ये सहभागी व्हायचं असून त्याला रशियाचा विरोध आहे आणि हेच या संघर्षामागील महत्त्वाचं कारण आहे. युक्रेन पूर्व भागातील रशियन लोकांवर अत्याचार करत असल्याचं सांगत रशियाने पहिला हल्ला केला होता. या संघर्षादरम्यान घडत असलेल्या अनेक भयावह गोष्टी हळूहळू जगासमोर येत आहेत. यात रशियातील एक कारागृह जोरदार चर्चेत आहे. रशियातील सिम्फरोपोल डिटेंशन सेंटर या तुरुंगात युक्रेनियन नागिरक कैद्यांचा खूप छळ केला जातो. छळाला कंटाळून येथील अनेक कैदी मृत्यूची भीक मागत असतात. रशियाने हजारो युक्रेनियन नागरिकांना पकडून या भयानक तुरुंगात डांबल्याचं सांगितलं जातं. असं डेली मेलच्या वृत्तात म्हटलं आहे. अलेक्झांडर टारकोव्हला मे 2022 मध्ये येथे कैद करण्यात आलं होतं. आता त्याने क्रेमलिन आणि रशियाला विरोध करणाऱ्या न्यूज वेबसाईटला बंद दरवाजाआडचे सत्य सांगितले आहे. टारकोव्हला मार्चमध्ये अटक करण्यात आली. खेरसनमध्ये रशियाविरुद्ध रॅली आयोजित केल्याचा आरोप त्याच्यावर होता. रशियातील या कारागृहात शिक्षेच्या नावाखाली कसे विजेचे शॉक दिले जातात हे त्याने सांगितले. या कारागृहात कैदी म्हणून राहिलेल्या मॅक्झिम नावाच्या व्यक्तीनं त्याच्यावर केलेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे. मॅक्सिमने सांगितलं, ``रशिया सुरक्षा एजन्सीचे अधिकारी चौकशीदरम्यान धमक्या देतात. तसेच आम्ही तुम्हाला लुहान्स्क येथे पाठवू, जिथे मृत्यूदंड कायदेशीर आहे आणि ते तुम्हाला गोळ्या घालतील, असं सांगतात. युक्रेनने युद्धाच्या कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या फौजदारी खटल्यासाठी त्यांनी आम्हाला साक्ष देण्याकरिता नेले होते. मारियुपोलमधील घरांमध्ये आणि नाट्यगृहात झालेल्या गोळीबाराबद्दल काही माहिती आहे का असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला.`` अलेक्झांडर टारकोव्हने सांगितले,`` कैदी कारागृहातून पळून जाऊ नयेत यासाठी तिथं हिंस्त्र कुत्रे ठेवण्यात आले आहेत. हा इलेक्ट्रिक चार्ज तुमच्या शरीरातील प्रत्येक स्नायूत पोहोचतो आणि त्याचा स्फोट होतो आणि मग तुमचे स्नायू आकुंचन पावू लागतात, असं वाटतं. जेव्हा तुमचा असा छळ केला जातो तेव्हा तुम्ही त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाही, जर तुम्ही काही केले तर अजून वाईट पद्धतीनं छळ केला जातो.`` ``मला कारागृहात नेण्यापूर्वी रशियाच्या ताब्यात असलेल्या एका बिल्डिंगच्या तळमजल्यावर नेलं आणि माझ्या कानावर विजेच्या तारांचे टोक लावून शॉक दिला गेला आणि ज्यांनी निर्दशने केली त्यांची नावं सांगण्यास सांगितले. या शिवाय एका रशियन एजंटने माझ्या कानावर बंदूक ठेवत गोळ्या घालण्याची धमकी दिली. हे तुरुंग म्हणजे मध्ययुगीन अंधारकोठडी आहे. या कारागृहात नवीन कैदी आला की सेलमध्ये त्याला टॉर्चर केलं जातं,`` असं टारकोव्हने सांगितलं. हे युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेन रशियावर युद्धविषयक गुन्ह्यांचा आरोप करत आहे. मात्र रशियाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, गुन्ह्यांशी संबंधित पुरावे आणि साक्षीदारही पुढे येत आहेत. असे असूनही क्रेमलिन हे नाकारत आहे. मात्र, युक्रेनचे दावे कितपत खरे आहेत, याची पुष्टी झालेली नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात