जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लोक भूक भागवण्यासाठी खातात मातीच्या रोट्या, कारण वाचून बसेल धक्का?

लोक भूक भागवण्यासाठी खातात मातीच्या रोट्या, कारण वाचून बसेल धक्का?

लोक भूक भागवण्यासाठी खातात मातीच्या रोट्या

लोक भूक भागवण्यासाठी खातात मातीच्या रोट्या

जगात प्रत्येक ठिकाणी लोकांची वेगवेगळी परिस्थिती असते. कुठे काही लोक श्रीमंत असून काहीही खाऊ शकतात तर कुठे लोकांचे खायचेही वांधे आहेत. काही लोक अन्नाची नासाडी करतात तर कुठे एक वेळ खायलाही लोकांना मिळत नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 जून : जगात प्रत्येक ठिकाणी लोकांची वेगवेगळी परिस्थिती असते. कुठे काही लोक श्रीमंत असून काहीही खाऊ शकतात तर कुठे लोकांचे खायचेही वांधे आहेत. काही लोक अन्नाची नासाडी करतात तर कुठे एक वेळ खायलाही लोकांना मिळत नाही. अशाच एका देशाविषयी आपण जाणून घेणार आहोत जिथे लोकांना साधं खायलाही मिळत नाही. ते मातीच्या रोट्या खातात. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र ही गोष्ट खरी आहे. कॅरिबियन समुद्रात वसलेला ‘हैती’ हा एक असा देश आहे जिथे गरिबी खूप जास्त आहे. येथील बहुतांश लोक कुपोषण आणि अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. याचे कारण म्हणजे येथील गरीब लोकांकडे ना औषधे घेण्यासाठी पैसे आहेत ना दवाखान्याचा खर्च उचलण्याची क्षमता. त्यांच्या गरिबीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की त्यांना खायला पोषक अन्नही नाही. त्यामुळेच हैतीतील गरीब लोक मातीच्या रोट्या खाऊन पोट भरतात.

News18लोकमत
News18लोकमत

हैतीच्या लोकांना डोंगरावरील माती वरदानापेक्षा कमी वाटत नाही. कारण त्यांच्याकडे इतर श्रीमंत देशांप्रमाणे खायला पोषक आहार नाही. म्हणूनच ते डोंगराच्या मातीपासूनच भाकरी बनवतात. ते प्रथम मातीत पाणी आणि मीठ मिसळून पेस्ट तयार करतात. मग ते या पेस्टला रोटीचा आकार देतात आणि उन्हात वाळवल्यानंतर खातात. Viral Video : कामामुळे जेवायला मिळाला नाही वेळ मग डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…. हैतीमध्ये राजकीय दडपशाहीचाही मोठा इतिहास आहे. लोकांमध्ये ज्ञान आणि शिक्षणाचा अभाव आहे. कृषी क्षेत्रातही हा देश खूप मागासलेला आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तींमुळेही या देशाच्या विकासात कुठेतरी अडथळा निर्माण झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात