नवी दिल्ली, 22 जून : लोक पोट भरण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. दिवस रात्र मेहनत करुन ते आपलं कुटुंब चालवतात. अशा कष्ट करुन पोट भरणाऱ्या लोकांचे अनेक निरनिराळे व्हिडीओ समोर येत असतात. कधी मजेशीर, तर कधी भावुक करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. अशातच एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाही. डिलिव्हरी बॉय लोकांना चांगले पदार्थ वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. कठोर परिस्थीतींचा सामना करुन हे आपलं काम करत असतात. कधी ग्राहकांचे वाईट व्यवहारही त्यांना सहन करावे लागतात. अनेकवेळा आपल्या कामामध्ये त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतोय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक डिलिव्हरी बॉय बिल्डिंग खाली उभा राहून आपलं जेवन करत आहे. त्याच्या गाडीवर झोमॅटेचा बॉक्सही दिसत आहे. तो इकडे तिकडे बघून कॅरीबॅगमधील जेवन खाताना दिसत आहे. त्याला जेवायचा वेळ न मिळाल्याने तो असं उभं राहून गडबडीत जेवन करत असल्याचं दिसून येतंय.
इस मौसम में इनका भी ख्याल रखें. pic.twitter.com/Rf2kHs4srk
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) June 20, 2023
डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ एका व्यक्तीने शूट केला असून हा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. @AwanishSharan नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 20 सेकंदाचा हा व्हिडीओ चर्चेत आला असून व्हिडीओवर भरपूर कमेंट येताना दिसत आहे. यापूर्वीही डिलिव्हरी बॉयचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली.