नवी दिल्ली 05 जानेवारी : माणूस असो किंवा प्राणी, आपल्या जवळच्या कोणाचं जाणं हे प्रत्येकासाठीच वेदनादायी असतं. बराच काळ सोबत राहिल्यांनंतर जेव्हा दूर जाण्याची वेळ येते, तेव्हा कोणीही भावुक होतं. सध्या इंटरनेटवर अशाच एका मोराचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Peacock) होत आहे, जो आपल्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावेळीही लोकांच्या मागे जात आहे. पत्नीसोबतच्या प्रत्येक भांडणानंतर पती गुपचूप करायचा हे काम; समजताच हादरली महिला आपल्या जवळच्या व्यक्तीपासून दूर जाण्याचं दुःख माणूस कथा-कवितांमधून मांडतो. मात्र प्राण्यांना आणि पक्षांनाही तितकंच दुःख होतं. या मोराचं दुःख पाहूनही तुम्हाला याचाच प्रत्यय येईल. सोशल मीडियावर व्हायरल (Emotional Video of Peacock) होणारा मोराचा हा व्हिडिओ पाहून लोक भावुक झाले आहेत. कारण हा मोर आपल्या साथीदाराला शेवटचा निरोप देण्यासाठी त्याला घेऊन जाणाऱ्या. लोकांच्या मागे जात आहे.
साथी साथ छोड़कर स्वर्गवास को चल पङा🥲🥲
— Bishnoi Media (@TheBishnoiMedia) January 2, 2022
मोक्षधाम तक साथ जाते हुए राष्ट्रीय पक्षी मोर, पक्षी होते हुए भी मित्र के बिछङने का असहनीय दर्द, यह नजारा देखकर हर कोई भावुक हो गया🥲🥲😭
बिश्नोई जी पेज की ओर से राष्ट्रीय पक्षी मोरराजा को भावभीन श्रद्धांजली 💐💐🙏
@sudhirbishnoi_ pic.twitter.com/3Iu6qWPo9P
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की हा मोर आपल्या साथीदाराच्या अंत्ययात्रेत मागे-मागे जात आहे. त्याची साथीदार हे जग सोडून गेला आहे. मात्र, कदाचित या मोराला या गोष्टीवर विश्वास बसत नाही की त्याच्या जोडीदार आता या जगात राहिला नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन तरुण मृत मोराला घेऊन चाललेले आहेत. हे तरुण जिकडे जातील, तिकडे हा मोर त्यांच्या मागे-मागे जात आहे. तो माणसांप्रमाणे आपलं दुःख व्यक्त करू शकत नाही, मात्र त्याचा हा व्हिडिओ पाहून सगळेच भावुक झाले आहेत. बदक आणि कोंबड्याने वाईट केली तरुणीची अवस्था; बिचारीने रडतच ठोकली धूम, VIDEO हा व्हिडिओ @Bishnoiofficiai नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, ‘साथीदार साथ सोडून स्वर्गात निघाला. त्याच्या अंत्ययात्रेत सोबत जाताना राष्ट्रीय पक्षी मोर. पक्षी असतानाही मित्राच्या दूर जाण्याचं इतकं दुःख, हे दृश्य पाहून कोणीही भावुक होईल.’ हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.