मोर पाहण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत घडला धक्कादायक प्रकार; पिकनिक सोडून रुग्णालयात करावं लागलं दाखल

मोर पाहण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत घडला धक्कादायक प्रकार; पिकनिक सोडून रुग्णालयात करावं लागलं दाखल

पुस्तकात दिसणाऱ्या मोराला समोर पाहून तो त्याच्या जवळ गेला

  • Share this:

लहान मुलांना प्राणी संग्रहालयात (Zoo Picnic) पिकनिकसाठी न्यायचं म्हटलं की ते फार उत्साही होतात. मुलं लहान असताना नवनवीन गोष्टी बघतात, त्यांचं निरीक्षण करतात त्यामुळे त्यांच्या मनात कुतूहल असतं. आता झालं काय की एका तीन वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन त्याचे आई-वडील (3 Year Old Attacked By Peacock) प्राणी संग्रहालयात पिकनिकला गेले. तिथं पुस्तकात दिसणाऱ्या मोराला समोर पाहून तो त्याच्या जवळ गेला. मात्र जसा तो चिमुकला त्याच्या जवळ गेला तशीच मोराने त्याला चोच मारली आणि तो जखमी झाला.

एजरा गिटोस (Ezra Gittoes) नावाचा हा चिमुकला एका आक्रमक मोराजवळ (aggressive peacock) गेला होता. या मोराने एजराच्या कपाळावर चोचीने जोरदार हल्ला केला. चिमुकला एजरा थोडक्यात बचावला नाही तर त्याचा डोळा देखील जाऊ शकला असता.

हे वाचा - ओ तेरी! चक्क कोंबडीने केला अंड्यासोबत स्टंट; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क

पालकांसोबत फिरायला गेला होता एजरा

3 वर्षांचा एजरा त्याच्या पालकांसोबत ‘फॅमिली डे’ (family day) निमित्त प्राणी संग्रहालयात फिरायला गेला होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊदेखील होता. फिरता फिरता एजराला मोर (peacock) दिसला. मोर पाहून तो खूश झाला आणि त्याच्याजवळ गेला. मात्र मोराला एजराचं जवळ येणं आवडलं नाही आणि त्याने एजराच्या कपाळावर चोच मारली (Peacock Pecked On Forehead). मोराने केलेल्या हल्ल्यामुळे एजराच्या कपाळातून रक्त येऊ लागलं. त्यामुळे त्याचे आई-वडील लगेच त्याला रुग्णालयात (hospital) घेऊन गेले.

प्राणी संग्रहालय प्रशासनाचं मौन

 

एजरा थोडक्यात बचावला नाहीतर त्याच्या डोळ्याला जखम झाली असती, असं त्याच्या पालकांनी काळजीच्या सुरात म्हटलं. त्यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणावर प्राणी संग्रहालयाने मौन बाळगलंय. तर, या ‘संग्रहालयात मोर चोच मारू शकतात’ असं जागोजागी लिहून पर्यटकांना इशारा देण्यात आला आहे, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय. दरम्यान एजराचे कुटुंबीय अनेकदा या प्राणी संग्रहालयात पिकनिकला (Zoo Picnic) येत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलाचा वाढदिवस (birth day ) देखील तिथे साजरा केला होता. तर या मुलाला मोराने चोच कशी मारली, यावर प्राणी संग्रहालय प्रशासनाने आश्चर्य व्यक्त केलं असून याआधी अशी घटना इथे घडलेली नाही. या संग्रहालयात मोर मुक्तसंचार करतात म्हणून ते प्रसिद्ध आहे.

Published by: Atharva Mahankal
First published: June 22, 2021, 10:50 PM IST
Tags: Zoo

ताज्या बातम्या