ओ तेरी! चक्क कोंबडीने केला अंड्यासोबत स्टंट; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क

माणसालाही जमलं नाही ते एका कोंबडीने सहजपणे केलं आहे.

माणसालाही जमलं नाही ते एका कोंबडीने सहजपणे केलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 22 जून : कोंबडी (Hen) म्हटली ही सहसा आपल्या पंखात अंड्यांना घेऊन दिसते. आपल्या पंखाच्या उबेत ती आपल्या अंड्यांचं संरक्षण करते. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) अशा कोंबडीचा व्हिडीओ व्हायरल (Hen video) होताना दिसतो आहे. ज्यात कोंबडी चक्क अंड्यासोबत स्टंट (Hen stunt with egg) करते आहे. हा व्हिडीओ (Viral video) पाहून तुम्हीसुद्धा धक्क व्हाल. अंड्यासोबत तसा स्टंट तुम्ही कधी ना कधी केलाच असेल. कधी अंडं हवेत भिरकावून, कधी हातावरून अंड सोडणं, कधी डोक्यावर अंडं ठेवून तोलणं, कधी अंड्यावर अंड ठेवण्याचा तर कधी उभं अंडं फोडण्याचा प्रयत्न करणं. अंड्यासोबत तुम्ही असे बरेच प्रयोग करून पाहिले असतील. पण या कोंबडीच्या स्टंटला तोडच नाही. व्हिडीओत पाहू शकता. सुरुवातीला कोंबडी आपल्या एका पायावरून दुसऱ्या पायावर अंड उडवते. मग ते हवेत भिरकावते. आपल्या मानेवर घेते, तिथून आपल्या पंखावर घेते. पुन्हा आपल्या मानेच्या खालील दिशेने भिरकावते आणि तिथून पायापर्यंत आणते. कोंबडीचा अंड्यासोबतचा हा स्टंट पाहून तुमचा डोळ्यांवरही विश्वास बसत नसेल. हे वाचा - हेल्मेट सोडा याचं तर शीरच झालं गायब; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसं हा व्हिडीओ एडिट केलेला आहे. हे स्पष्ट दिसतं आहे. तरी नेटिझन्सच्या तो खूपच पसंतीस पडत आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? किंवा तुम्ही कधी असं कोणत्या कोंबडीला स्टंट करताना पाहिलं आहे का? याबाबत कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या.
    Published by:Priya Lad
    First published: