मुंबई, 27 सप्टेंबर: प्राण्यांचे आणि अनेकदा सापासोबत पंगा घेतल्यानंतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं मात्र सध्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. नुसता अजगराला पाहूनही जिथे भोवळ येते अशावेळी अजगर आपल्या मागे लागला तर काय होईल? तोंडातून शब्द फुटणार तर नाहीच पण कल्पनाच करून अंगावर शहारे येतील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की हा तरुण पाण्यात असलेल्या सापाची शेपटी धरून त्याला बाहेर काढतो. साप पाण्यातून बाहेर आल्यावर या तरुणावर फुत्कारून हल्ला कऱण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा पाण्यात जातो. हा तरुण त्याच्या मागे जाणार तेवढ्यात मागून हल्ला करण्यासाठी अजगर येतो आणि तरुण पाण्यात पडतो.
WTF is going on here pic.twitter.com/bWy1ro8833
— The Unexplained (@Unexplained) September 24, 2020
हे वाचा- कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तरुणाचा भन्नाट जुगाड, VIDEO पाहून व्हाल हैराण हा व्हिडीओ आतापर्यंत 465 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. साडेतीन हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहताना काळजाचा ठोका चुकतो अशी कमेंट एका युझरनं केली आहे. तर दुसरा युझर म्हणतो या सापानं आधीच प्लॅन केला असावा. 500 हून अधिक कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.