Home /News /national /

स्वदेशी लशीचा बालकांवरही यशस्वी प्रयोग, लहान मुलांसाठीही Covaxin सुरक्षित असल्याचा दावा

स्वदेशी लशीचा बालकांवरही यशस्वी प्रयोग, लहान मुलांसाठीही Covaxin सुरक्षित असल्याचा दावा

भारतात कोरोनाला रोखणारी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बाजारात येण्याची शक्यता आहे. दरम्यान या लसीच्या दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीत एक अपवादात्मक प्रयोग केला गेला आहे.

नवी दिल्ली, 4 जानेवारी : कोरोनाला (Corona) शक्य तितक्या लवकर रोखण्यासाठी सध्या  सगळं जग शक्य तितक्या लवकर प्रभावी लस शोधण्यात गुंतलं आहे. भारतही याला अपवाद  नाही. भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हीशिल्ड आणि भारत बायोटेकची कॅव्हॅक्सिन (Covaxin of Bharat Biotech) या दोन लसींना आणीबाणीच्या वापराची मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत (phase 2 trials) 380 व्यक्तींवर लसीची चाचणी केली गेली. यात प्रौढ व्यक्तींसह निरोगी बालकांचाही (children) समावेश आहे. जगभरातील लशींच्या चाचण्यांमध्ये बालकांचा समावेश फार कमी ठिकाणी केला गेला. त्यामध्ये भारत बायोटेकच्या स्वदेशी लशीचा समावेश आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन अर्थात WHO ने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गरोदर महिला आणि बालकांना लसीच्या चाचण्यांमधून वगळले जाणे अपेक्षित आहे. आजवर जगातल्या कुठल्याही देशानं बालकांवर लसीच्या चाचण्या केलेल्या नाहीत. मात्र भारत बायोटेक या भारतीय लस निर्मात्या कंपनीनं पहिल्यांदाच हा प्रयोग केला आहे. या प्रयोगाचे परिणामही सकारात्मक आलेले असून बालकांना कुठलाही अपाय झालेला नसल्याचं चित्र सध्या तरी दिसतं आहे. त्यामुळे आमची लस ही प्रौढांसह बालकांसाठीही सुरक्षित आहे असा दावा 'भारत बायोटेक'नं आता केला आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये निरोगी बालकांचा समावेश केला गेला. यात चार आठवड्यांच्या अंतराने लसीचे दोन डोस दिले गेले. दरम्यान पहिल्या टप्प्यातील स्वयंसेवकांमध्ये तीन महिन्यानंतर कोव्हॅक्सिनचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. या स्वयंसेवकांमध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या अँटीबॉडीज (antibodies)  आणि टी-सेल मेमरी रिस्पॉन्सेस आढळून आले आहेत. ही लस सुरक्षित असल्याचेही आता दुसऱ्या टप्प्यावर सिद्ध झाले आहे. याशिवाय दुसऱ्या टप्प्यावर शरीरातील द्रवपदार्थांसंबंधी (humoral) आणि पेशींच्या मध्यस्थीने (cell mediated) निर्माण झालेले इम्यून रिस्पॉन्सेसही दिसून आले. दरम्यान, भारत बायोटेकच्या लसीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI कडून आणीबाणीच्या वापरासाठी देण्यात आलेल्या मंजुरीवर अनेकांनी आक्षेपही घेतले आहेत. यात कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यासह जयराम रमेश यांचाही समावेश आहे. त्यांनी कोव्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्याच्या यशस्वितेची पुरेशी खात्री होण्याआधीच तिला मंजूरी देणं धोकादायक असल्याच्या मुद्द्याकडे केंद्र सरकारसह केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचं लक्ष वेधलं आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Corona vaccine, India, Trial

पुढील बातम्या