Home /News /viral /

कॅमेरा ऑन होताच मोबाईल घेऊन उडाला पोपट; असा Video रेकॉर्ड केला की पाहूनच थक्क व्हाल

कॅमेरा ऑन होताच मोबाईल घेऊन उडाला पोपट; असा Video रेकॉर्ड केला की पाहूनच थक्क व्हाल

पोपटाच्या हाती लागला मोबाईल आणि...

पोपटाच्या हाती लागला मोबाईल आणि...

मोबाईल हाती लागताच पोपटाने कमालच केली.

    मुंबई, 26 ऑगस्ट : हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल हा असतोच. मोबाईलवर फोटो, व्हिडीओ काढायला तर अनेकांना आवडतातच. आता तर अगदी पक्ष्यांनाही मोबाईलचं वेड लागलं की काय असंच वाटू लागलं आहे. याचं कारण म्हणजे हा पोपट (Parrot). जो चक्क एका तरुणाच्या हातातून मोबाईल खेचून (Parrot snatched mobile) घेऊन गेला आणि त्याने भारी असा व्हिडीओ रेकॉर्ड केला की तुम्ही पाहूनच थक्क व्हाल (Parrot flew with mobile). पोपट माणसांप्रमाणे बोलतात हे आपल्यासाठी आता काही नवल नाही. पण या पोपटाच्या अंगी माणसांसारखीच कलासुद्धा असते की काय, असाच प्रश्न आता या पोपटाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडतो. सोशल मीडियावर पोपटाचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता छतावर एक व्यक्ती पोपटाच्या मागे पळताना दिसतो आहे. पोपटाने त्याच्या हातातील फोन खेचून घेतला आणि तो भुर्रर्रकन उडाला. त्या व्यक्तीच्या हाती काही तो पोपट लागत नाही. पोपटाने आपल्या दोन्ही पायात मोबाईल फोन पकडला. त्यावेळी त्या फोनचा कॅमेरा सुरूच होता. हे वाचा - VIDEO - माकडानेही घेतला तिसऱ्या कोरोना लाटेचा धसका; संपूर्ण चेहराच मास्कने झाकला पोपट आकाशात उडत होतं आणि त्यावेळी मोबाईलच्या कॅमेऱ्यात खालील दृश्य दिसत होतं. पोपटाच्या पंखांचा फडफडण्याचा, हवेच्या वेगा आवाज या व्हिडीओत ऐकू येतं. तर खाली त्या संपूर्ण परिसराचं सुंदर असं दृश्यं दिसून येतं. रस्त्यावरील घरं, त्यांचे छप्पर, रस्ते, रस्त्यावरील गाड्या, झाडं  सर्व सर्वकाही सुंदर असं दृश्य आकाशातून हा पोपट त्या कॅमेऱ्यात कैद करू घेतो. मोबाईल घेऊन बरीच सैर केल्यानंतर तो एका ठिकामी बसतो. त्यानंतर काही लोक त्याच्या मागे तो मोबाईल मिळवण्यासाठी लागलेले असतात. त्यांचा आवाज ऐकून तो पुन्हा उडू लागतो आणि थोड्या अंतरावर जाऊन तो एका कारवर बसतो. त्यानंतर व्हिडीओ रेकॉर्डिंग बंद होतं. हे वाचा - VIDEO - मुंगूसापेक्षाही भारी पडला कोंबडा! प्रतिकार दूर सापाने भीतीनेच ठोकली धूम पोपटाने अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण परिसर फिरवला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. फ्रेड शुल्त्स (Fred Schultz) ट्विटर युझरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या