हुशार पोपट! तहान भागवण्यासाठी अशी लढवली शक्कल; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

हुशार पोपट! तहान भागवण्यासाठी अशी लढवली शक्कल; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

तहानलेल्या पोपटाचा (Thirsty Parrot) हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला गोष्टीतील तहानलेल्या कावळ्याची आठवण येईल.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. याच तहानलेल्या कावळ्याच्या गोष्टीसारखीच घटना प्रत्यक्षात घडली आहे. इथं फक्त तहानलेला कावळा नाही तर तहानलेला पोपट (Thirsty Parrot) आहे आणि कावळ्याच्या गोष्टीतील पाण्याच्या भांड्याऐवजी नारळाचं झाड (Coconut tree)) आहे. या तहानेलल्या पोपटाचा नारळपाणी (Coconut Water) पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे.

आयएफएस ऑफिसर सुसंता नंदा यांनी आपल्या ट्विटवरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. एक सुंदर पोपट नारळाच्या झाडावर चढून नारळपाणी पितानाचा हा व्हिडीओ आहे.

पाण्याच्या शोधात हा पोपट एका नारळाच्या झाडावर येतो. नारळाच्या झाडावर बसून तो एक नारळ तोडतो. या नारळाला आपल्या चोचीने छेद करतो आणि त्याच्या आकाराच्या मानाने मोठा असलेला हा नारळ तो चोचीत धरतो. चोचीत नारळ धरून त्यातील पाणी तो घटाघटा पिऊ लागतो. असं थंडगार नारळपाणी पिऊन पोपट आपली तहान भागवतो.  व्हिडीओतील पोपट हा मकाऊ प्रजातीचा आहे. ज्याला रंग निळा आणि शेपटी पिवळी आहे.

हे वाचा - 'खईके पान बनारसवाला'वर छोट्या डॉनचा डान्स; बिग बीही प्रेमात, शेअर केला VIDEO

सुसंता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना नारळ पाणी पिणं कुणाला आवडतं असं कॅप्शन दिलं आहे. याशिवाय त्यांनी नारळपाण्याचे फायदेही सांगितले आहेत. नारळपाणी पचनक्रिया चांगली ठेवण्यात मदत करतं. नारळपाणी प्यायल्याने खाल्ल्यानंतर होणारी मळमळ जाणवत नाही. नारळपाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइड संतुलित ठेवण्यास मदत करतात आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हे वाचा - माकडाच्या हाती आलं गिफ्ट, पुढे काय गंमतीशीर प्रकार घडला पाहा VIDEO

हा व्हिडीओ अनेकांनी लाइक केला, अनेकांनी रिट्वीट केला आणि त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. गोष्टीतल्या कावळ्याने जशी पाणी पिण्यासाठी शक्कल लढवली. तशीच शक्कल या पोपटानेही लढवली. त्यामुळे त्याचे हुशारीलाही नेटिझन्सनी दाद दिली आहे.

Published by: Priya Lad
First published: August 10, 2020, 12:29 PM IST

ताज्या बातम्या