'खईके पान बनारसवाला'वर छोट्या डॉनचा डान्स; बिग बीही पडले प्रेमात, शेअर केला VIDEO

'खईके पान बनारसवाला'वर छोट्या डॉनचा डान्स; बिग बीही पडले प्रेमात, शेअर केला VIDEO

हा व्हिडीओ पाहून अमिताभ बच्चनही स्वत:ला आवरू शकले नाहीत.

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : 'खईके पान बनारस वाला' हे गाणं ऐकलं ही हमखास बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) समोर येतात. त्यांचीच आठवण येते. या गाण्यातील त्यांचा डान्स डोळ्यासमोर येतो. मात्र आता त्यांच्या याच गाण्यावर एका चिमुकल्याने डान्स केला आहे आणि डान्स पाहून बिग बीदेखील त्याच्या प्रेमात पडले आहे.

अमिताभ बच्चन यांनी चिमुकल्या डॉनचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ एक क्युट असा छोटा मुलगा आहे. जो मांडीवर बसून अमिताभ बच्चन यांचं सुपरहिट गाणं खईके पान बनारसवाला वर डान्स करताना दिसतो आहे.

या व्हिडीओत या मुलाचे एक्स्प्रेशन पाहण्यासारखे आहेत. व्हिडीओ पाहून अमिताभ यांनादेखील हसू आलं. त्यांना 'हाहाहा... बेचारा..पण खूप क्युट'. अशी प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दिली आहे. अमिताभ यांचे चाहतेदेखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहे.

हे वाचा - भल्लालदेव अडकला लग्नाच्या बेडीत; राणा दग्गुबाती-मिहिका बजाजच्या लग्नाचे PHOTO

अमिताभ सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी काही काही ना शेअर करत असतात. त्यापैकीच हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलेल. याआधी अमिताभ यांनी आर्या नावाच्या गायिकेचं गाणं ट्वीट केलं होतं. अमिताभ यांनी केलेल्या ट्वीटमुळे आर्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. आर्या वेस्टर्न आणि इंडियन म्युझिक मिक्स कंपोजिंग गाणं गाते.

हे वाचा - यावर्षी कसा आहे तुमचा मूड? बॉलिवूड-हॉलिवूड कलाकारांचं 2020 Mood Meme Challenge

अमिताभ यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे. जया बच्चन यांना सोडून बच्चन कुटुंबातील सर्व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सर्वात आधी ऐश्वर्या आणि आराध्या यांनीही कोरोनाशी लढा जिंकला आहे. त्यानंतर अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांचाही रिपोर्ट कोरोना नेगेटिव्ह आला आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं.

Published by: Priya Lad
First published: August 9, 2020, 9:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading