गुवाहाटी, 20 ऑगस्ट : पाणीपुरी (Paanipuri) म्हटलं की तोंडाला पाणीच सुटतं. कितीतरी जणांना पाणीपुरी (Paanipuri video) आवडतं. पाणीपुरी (Paanipuri viral video) दिसताच तो खाण्याचा मोह आवरत नाही. पण पाणीपुरी खाताना सावध राहा! कारण तुम्ही जी पाणीपुरी खात आहात त्यातील चटपटीत पाणी लघवी (Urine in Paanipuri) असू शकते. एका पाणीपुरी विक्रेत्याचा हा प्रताप सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. पाणीपुरीच्या पाण्यात पाणीपुरी विक्रेत्याने चक्क आपली लघवी मिसळली आहे. आसाममध्ये (Assam) रस्त्यावर पाणीपुरी विकणाऱ्या विक्रेत्याचा व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहे (Assam Paanipuri video).
Shocking!A street vendor(pani puri saller) has been arrestd in Guwahati after viral a sensational video in which he mixed his urine with water and using the same Water in Pani Puri.#ViralVideo #Guwahati @ABPNews @ANI @the_viralvideos @ViralPosts5 @indiatvnews @TheQuint @SkyNews pic.twitter.com/YEmOM26R9Q
— Farhan Ahmed (@farhan_assam) August 20, 2021
पाणीपुरीवाला आपली लघवी पाणीपुरी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात मिसळताना दिसला. फरहान अहमद या ट्विटर युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे वाचा - फायर स्टंट बेतला जीवावर! आगीच्या विळख्यात कराटे मास्टरचा मृत्यू; Shocking video व्हिडीओत पाहू शकता, पाणीपुरीवाला हळूच आपल्या कपड्याच्या मागून एक छोटं भांडं काढताना दिसतो. त्यात पाणी आहे आणि ते तो आपल्या शेजारी असलेल्या पाण्याच्या बादलीत ओततो आणि काही खाली ओतून टाकतो. या भांड्यातील पाणी दुसरं तिसरं काही नाही तर त्याची लघवी आहे. त्याचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला. हे वाचा - दाखवून द्या तुम्हीच आहात हुश्शार! VIDEO मध्ये मधमाश्यांच्या ‘राणी’ला शोधा व्हिडीओ पाहूनच किळस येते. हे धक्कादायक दृश्य आहे गुवाहाटीतल्या अथगाव परिसरातील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पोलिसांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला. त्यांनी या विक्रेत्याला बेड्या ठोकत, त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे.