मुंबई, 1 फेब्रुवारी : लहान मुलांच्या नावांमध्ये खूप वैविध्य असतं. कोणी देवादिकांची नावं मुलांना ठेवतं, तर कोणी ऐतिहासिक व्यक्तींची नावं ठेवतं. पाकिस्तानी संगीतकार ओमर एसा आणि त्याची बांग्लादेशी पत्नीनं मात्र त्यांच्या मुलाला नाव ‘India’ असं नवं नाव द्यायचं ठरवलंय. एका फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी त्याबाबत सांगितलंय. त्यामागचं कारण विचित्र आहे. 'टाइम्स नाऊ'ने त्याबाबतचं वृत्त दिलंय.
काय आहे कारण?
या जोडप्याची एक फेसबुक पोस्ट सध्या खूप व्हायरल होतेय. त्यात त्यांनी त्यांच्या मुलाना इंडिया असं नाव का द्यायचं ठरवलंय, याचं नेमकं कारण सांगितलंय. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘नव्यानं पालक झालेल्या सगळ्यांना ही सूचना आहे आणि आमच्यासारखीच चूक ज्यांनी केलीय त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. आमचा पहिला मुलगा इब्राहिम लहान असताना आम्ही दोघांनी त्याला आमच्या जवळ झोपण्याची सवय लावली. आम्ही त्याच्याबद्दल खूप काळजी करायचो.’
Viral Video : वरात यायला उशीर झाला, म्हणून गच्चीवर गेली नवरी आणि...
एसा यांचा मुलगा इब्राहिम आता थोडा मोठा झालाय. त्याची स्वतःची बेडरूम आहे; मात्र अजूनही तो आई-वडिलांजवळच झोपतो. आई-वडील मुलांची खूप काळजी घेतात. लहानपणापासून त्यांना सतत स्वतःच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याबाबत एसा यांनी फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख केलाय. असं वागून चूक केल्याचं त्यांनी म्हटलंय. ते म्हणतात, ‘इब्राहिमला लहानपणापासून याच पद्धतीनं झोपण्याची सवय झालीय. त्यामुळे तो आमच्या मध्येच कायम झोपतो. स्वतःची बेडरूम असूनही त्याला इथेच झोपायला आवडतं.’
ओमर एसा पाकिस्तानी आहेत, तर त्यांची पत्नी बांग्लादेशी आहे. त्याबाबत ते म्हणतात, ‘मी पाकिस्तानी आणि पत्नी बांग्लादेशी असल्यानं आम्ही मुलाला ‘इंडिया’ असं नाव दिलंय.’ पाकिस्तानी आणि बांग्लादेशी पालकांच्या मध्यभागी असल्यानं त्याला हे नाव दिल्याचं ते म्हणतात. आमच्या आयुष्यात ‘इंडिया’मुळे काही प्रश्न उद्भवतायत, असंही त्यांनी विनोदाने लिहिलं आहे.
महिलांचे ब्रेस्ट ते रोमान्स यावरही Tax; या विचित्र करांबाबत तुम्हाला माहिती आहे का?
या पोस्टला फेसबुकवर 23 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेक पालकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. पालकांच्या मध्ये झोपणं मुलांना सुरक्षित वाटतं असं एकानं म्हटलंय, तर एकानं म्हटलंय, की लहानपणीच मी आमच्या मुलीला स्वतंत्र बेडवर झोपण्याची सवय करण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते जमलं नाही. त्यांना पालकांसोबत झोपावसं वाटतं, यासाठी मुलांना दोष देऊ शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, India, Pakistan, Viral post