व्हिडिओ झाला व्हायरल आमीर लियाकत हुसैन यांचा हा व्हिडिओ तैमूर जमून नावाच्या सोशल मीडिया अकाउंटरवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हाईट कुर्ता, विजार आणि नेहरू जॅकेट घातलेले आमीर हुसैन आपल्याच धुंदीत या गाण्यावर ठेका धरत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. त्यांच्या हालचाली आणि स्टेप्स या अत्यंत आकर्षक असून ते आपल्या नृत्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेत असल्याचं या व्हिडिओत दिसून येतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अनेकांना तो आवडला आहे. मात्र पाकिस्तानमधील काही नागरिक असे आहेत, ज्यांना हा प्रकार बिलकूल आवडलेला नाही. आपल्या लोकप्रतिनिधीनं अशा प्रकारे एका भारतीय गाण्यावर डान्स करावा, ही बाब अनेक पाकिस्तानी नागरिक पचवू शकलेले नाहीत, ही बाब या व्हिडिओवरील कमेंट्स वाचून लक्षात येते. हे वाचा - डान्सचं वावडं सार्वजनिक जीवनात असणाऱ्या व्यक्तीनं सतत धीरगंभीर आणि अरसिक असावं, असंच सनातनी विचारांच्या नागरिकांना वाटत असतं. भारताप्रमाणंच पाकिस्तानातली अशा नागरिकांची संख्या मोठी असल्याचं या निमित्तानं दिसून आलं आहे. एकीकडे हा व्हिडिओ तरुणाईत जोरदार हिट झाला आहे, तर दुसरीकडे काही परंपरावादी लोक मात्र या व्हिडिओला नाकं मुरडताना दिसत आहेत.Tip Tip Barsa Paani 🔥🔥🔥 pic.twitter.com/0IBo4J4oqq
— Taimoor Zaman (@taimoorze) January 5, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.