Home /News /maharashtra /

पंढरपुरात सावकारी जाच, त्रासाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास

पंढरपुरात सावकारी जाच, त्रासाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास

खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून पंढरपुरातील तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पंढरपूर, 6 जानेवारी : राज्यात अद्यापही खासगी सावकरांचा (Private Money Lender) जाच हा सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. सावकरी जाचाला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उपचल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पंढरपूर (Pandharpur) येथे घडली आहे. व्याजाच्या पैशात लिहून दिलेले घर सावकाराने परस्पर विक्री केल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने या तरूणाने गळफास घेतला. संतोष प्रकाश साळुंखे असं आत्महत्या केलेल्या या तरूणाचे नाव आहे. (Pandharpur youth commits suicide after harassment of private money lender) या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपुरातील खासगी सावकार शेखर कुंदरकर, सुवर्णा अंकुश बिडकर आणि अंकुश रामा बिडकर (सर्व रा. अनिलनगर पंढरपूर) यांच्याकडून संतोष साळुंखे याने व्याजाने पैसे घेतले होते. त्यांचे पैसे व्याजासह संतोष यांनी परत केले होते. पेसे परत केले असतानाही या तिघांनी संतोषला व्याजाची जादा रक्कम दे म्हणून मारहाण केली. शिवाय व्याजाच्या पैशात लिहून‌ घेतलेल्या घराची परस्पर विक्री केली. याच मानसिक धक्क्यातून संतोष याने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी संशयित आरोपी शेखर दत्तात्रय कुंदरकर याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यवतमाळमध्ये सावकारी जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या ऑगस्ट 2021 मध्ये सावकारी जाचाला कंटाळून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना यवतमाळमध्ये घडली होती. एका मॉड्युलर फर्निचर व्यावसायिकाने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करून जीवन यात्रा संपविली. तुषार माणिकराव साठवणे असं आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्यांचे नाव होतं. त्याने वडगाव परिसरात मॉड्युलर फर्निचरचा व्यवसाय केला होता. लॉकडाऊनच्या काळात त्याचे दुकान पुर्णतः बंद होते. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत दुकान उघडण्यासाठी तुषार यांनी खाजगी सावकार ताटी पलूमवार यांच्याकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. व्यवसाय पूर्ववत सुरू झाला की कर्जाची परत फेड करू अस तुषार यांनी सांगितलं होतं. परंतु कर्जाच्या व्याजासाठी सावकाराकडून तगादा लावण्यात आला. सावकाराकडून अपमानस्पद वागणूक देण्यात होती, त्यातच दुकानाची आवक बंद असल्याने कुटुंबाचा गाडा हाकणे ही कठीण झाले होते. त्यामुळे हताश झालेल्या तुषार यांनी अखेर राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Pandharpur, Suicide

पुढील बातम्या