मराठी बातम्या /बातम्या /Viral /

घोर कलयुग! चण्याच्या पिठात घोळवून तयार केली ओरियो बिस्कीटची भजी; VIDEO पाहून चक्रावाल

घोर कलयुग! चण्याच्या पिठात घोळवून तयार केली ओरियो बिस्कीटची भजी; VIDEO पाहून चक्रावाल

हा व्हिडीओ गुजरातमधील एका ढाब्याचा आहे.

हा व्हिडीओ गुजरातमधील एका ढाब्याचा आहे.

हा व्हिडीओ गुजरातमधील एका ढाब्याचा आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) नियमित मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतात. अनेकदा स्ट्रीट फूडचे अनेक चित्र-विचित्र प्रकरणं समोर येत असतात. नुकतच अहमदाबादमधून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्ट्रीट फूड वेंडरने ओरियो बिस्किटची (Oreo Biscuit ) भजी केली आहेत, याबद्दल एका व्यक्तीने आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. (Oreo Biscuit Bhaji made by mixing chana flour in gujrat watch viral VIDEO)

ही घटना अहमदबाद येथील आहे. हा व्हिडीओ ब्लॉगर अमर सिरोहीने शेअर केला आहे. त्याने सांगितलं की, हा विचित्र पदार्थ सध्या तरुणांमध्ये बराच प्रसिद्ध होत आहे. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, ही डिश करण्यासाठी वेंडरने कोण कोणत्या पदार्थांचा उपयोग केला आहे.

हे ही वाचा-शारीरिक संबंधांदरम्यान आला हार्टअटॅक, एका चुकीमुळे गेला असता महिलेचा जीव

सांगितलं जात आहे की, ही डिश बनवण्यासाठी स्ट्रीट फूड वेंडरने बेसन आणि मीठाचा घोळ तयार केला. यानंतर या मिश्रणात ओरिया बिस्किट घातले आणि बटाट्याच्या भजीप्रमाणे बिस्कीट घोळवून गरम तेलात तळून घेतलं. आणि ही भजी मिरची आणि खजूरच्या चटणीसोबत सर्व्ह केलं.

" isDesktop="true" id="628111" >

या डिशची किंमत 100 ग्रॅमसाठी 20 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकही हैराण झाले. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, हे कलयुग आहे.

First published:

Tags: Food, Gujrat, Video viral