जाहिरात
मराठी बातम्या / Viral / फोटोत दडलेल्या माणसाला 11 सेकंदांत शोधणारे ठरतील ‘सुपर जीनिअस’, नेमकं काय आहे प्रकरण?

फोटोत दडलेल्या माणसाला 11 सेकंदांत शोधणारे ठरतील ‘सुपर जीनिअस’, नेमकं काय आहे प्रकरण?

फोटोत दडलेल्या माणसाला 11 सेकंदांत शोधणारे ठरतील ‘सुपर जीनिअस’, नेमकं काय आहे प्रकरण?

ऑप्टिकल इल्युजन म्हणजे सगळा नजरेचा खेळ आहे.

  • -MIN READ Trending Desk New Delhi,Delhi
  • Last Updated :

    तंत्रज्ञानामुळे व्हायरल गोष्टी जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात सहज पोहोचतात. दररोज काही ना काही चित्रविचित्र गोष्टींचे व्हिडिओज, फोटोज व्हायरल होतच असतात. नेटिझन्सचं लक्ष वेधून घेणं हाच त्यामागचा उद्देश असतो. अशाच व्हायरलच्या जमान्यात सध्या विविध ऑप्टिकल इल्युजन्स निर्माण करणारे फोटोज, खेळ चांगलेच चर्चेत आहेत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे दृष्टिभ्रम. अनेकदा असे काही फोटोज असतात ज्यात एखादा प्राणी, वस्तू काहीतरी दडलेलं असतं. ते शोधून काढणं हे अवघडच असतं. असाच एक दृष्टिभ्रम निर्माण करणारा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’नं दिलं आहे. तुम्हाला या जंगलात कुणी माणूस दडलेला दिसतोय? सोशल मीडियावर एका जंगलाचा फोटो शेअर करण्यात आलाय. या फोटोत झाडं, छोटे-मोठे दगड असं सगळं आहे. प्रथमदर्शनी तुम्ही हा फोटो पाहिलात, तर तो तुम्हाला सर्वसाधारण फोटो भासू शकेल; पण या जंगलाच्या फोटोत एक मनुष्य आहे. अशा या व्यक्तीला शोधून काढणं हेच काम करायचं आहे. फोटोत सगळीकडे हिरवी झाडं, मोडक्या फांद्या, मातकट रंगांचे, शेवाळी रंगाचे दगड, पालापाचोळा दिसतोय. यातून माणूस शोधणं अवघड आहे; पण हे काम 11 सेकंदांत पूर्ण करणाऱ्या व्यक्ती सुपर जीनिअस ठरतील. या माणसाने स्वत:ला अशा प्रकारे लपवलंय की, त्याचं फोटोत असणं जाणवत नाहीये. यासाठीच त्याला शोधणं तितकंसं सोपं नाही. यासाठी तुमच्या बुद्धीचा कस लागणार आहे. इतकंच नाही तर तुमची नजरही तीक्ष्ण असणं आवश्यक आहे. लपलेल्या माणसाला शोधणं आहे अतिशय अवघड - ऑप्टिकल इल्युजन म्हणजे सगळा नजरेचा खेळ आहे. तुमच्या निरीक्षण शक्तीची ही परीक्षाच असते. अशा प्रकारच्या दृष्टिभ्रमाच्या खेळात वस्तू शोधायला वेळ लागू शकतो. कारण अनेकदा समोर असलेल्या वस्तूही आपल्याला दिसत नाहीत. यासाठी निरीक्षणशक्ती चांगली असेल तर जंगलात दडलेला माणूस शोधणं सोपं आहे. आम्ही तुम्हाला एक क्लू देतो. या संपूर्ण चित्रात हा माणूस डाव्या बाजूला नाही. हे लक्षात घेऊन तुम्ही माणूस शोधू शकाल. कदाचित हे कळल्यावर काही जणांनी लगेचच शोध घेतला असेल. तुम्हाला तो माणूस दिसला तर तुम्ही बुद्धिवान आहात असंच म्हणायला हवं; पण तरीही ज्या नेटिझन्सना अजूनही तो माणूस सापडला नसेल, तर खाली दिलेलं चित्र पाहा. निरीक्षणदृष्टी आणि बुद्धीचा वापर केल्यास ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रातून कुठलीही वस्तू शोधणं अवघड नाही हे मात्र निश्चित.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: forest , photo
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात