मुंबई, 9 जुलै : नजरेची कुठे आणि कशी फसगत होईल हे सांगता येत नाही. कधी खास रेखाटलेली चित्रं, (Painting) तर कधी नकळपणे टिपलेले फोटो (Photo) डोळ्यांना अशा प्रकारे फसवतात, की वास्तव समजणं कठीण होऊन जातं. याला ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) असं म्हणतात. अशी चित्रं किंवा फोटो पहिल्या दृष्टिक्षेपात समजणं आणि त्यात लपलेल्या गोष्टी शोधणं केवळ अशक्य असतं. मोठे कलाकार विशेष मेहनत घेऊन अशी चित्रं तयार करतात. नुकत्याच ऑनलाइन प्रसिद्ध झालेल्या एका इमेजमध्ये कुत्रा (Dog) शोधून काढण्याचं आव्हान दिलं गेलं आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेल्या या इमेजमध्ये अगदी समोर बसलेला कुत्रा नेटिझन्सना शोधून काढायचा आहे. हे एका खोलीचं चित्र असून, खोलीत सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या आहेत; मात्र त्यात दडलेला कुत्रा शोधून काढताना बुद्धिमत्तेचा अक्षरशः कस लागत आहे. 10 सेकंदांत कुत्रा शोधण्याचं आव्हान कधी चित्रकाराच्या कलेचं आश्चर्य, तर कधी हातात कॅमेरा धरलेल्या व्यक्तीचं क्लिक हे सर्वोत्कृष्ट चित्राचं किंवा फोटोचं कारण ठरतं. कॅमेराने खास अॅंगल लावून क्लिक केलेला फोटो डोळ्यांसोबतच मनालादेखील भुरळ पाडतो. आता हाच फोटो घ्या ना, ज्यामध्ये फक्त 10 सेकंदांत कुत्रा शोधण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. हा फोटो एका खोलीचा (Room) आहे. खोलीला एक दरवाजा आहे. टेबल, खुर्ची, लाइट आणि सोफा आदी वस्तू योग्य जागी ठेवण्यात आल्या आहेत. या सर्वांमध्ये एक गोंडस फर असलेला कुत्रा असून, त्याला शोधून काढण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. काही जणांना हे खूप कठीण आव्हान वाटलं. त्यांना कुत्रा शोधण्यासाठी 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला. काही जणांनी अगदी काही सेकंदांत सोफ्यावर विश्रांती (Rest) घेत असलेला कुत्रा शोधून काढला.
( देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्डची एन्ट्री, सीबीआयच्या मुंबई-महाबळेश्वरमधील छापेमारीत धक्कादायक माहिती उघड ) सोफ्याच्या कव्हरमध्ये एकरूप झालाय कुत्रा खरं तर, सोफ्यावर क्रीम कलरचं (Cream Colour) फर कव्हर आहे. कुत्र्याचं शरीरदेखील क्रीम कलरचे केस असलेलं आहे. त्यामुळे कुत्रा आणि सोफा हे दोन्ही एकरूप झाले आहेत. त्यामुळे एका नजरेत त्याचा शोध घेणं अनेकांना अवघड जात आहे. हिरव्या रंगाच्या सोफ्यावर झोपलेला हा कुत्रा कोणालाच पटकन दिसणार नाही. सोफ्याच्या कव्हरशी तो इतका मिसळून गेला आहे की कव्हर कोणतं आणि कुत्रा कोणता हेच पटकन कळून येत नाही.