एडिनबर्ग, 10 जून : तसं तुम्ही पाहिलं असेल काही सेलिब्रिटी त्यांच्या ड्रेसमुळे वादात येतात. ड्रेसच्या विचित्र डिझाइनवरून त्यांना ट्रोल केलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे हा एक असा ड्रेस जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पण तो ड्रेसच्या डिझाईनमुळे नव्हे तर तर त्याच्या रंगामुळे. या ड्रेसचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच एकच खळबळ उडाली होती. कारण प्रत्येकाला या ड्रेसचा रंग वेगवेगळा दिसत होता. स्कॉटलंडमधील सेसिलिया ब्लेसडेल नावाच्या महिलेने खरेदी केलेला हा ड्रेस. तिची मुलगी ग्रेसचा केअर जॉन्सन या तरुणाशी 2015 साली लग्न होतं. तेव्हा सेसिलियाने लेकीच्या लग्नात घालण्यासाठी म्हणून हा ड्रेस खरेदी केला होता. तिने इंग्लंडमधील चेशायर ओक्स डिझायनर आउटलेटमध्ये हा ड्रेस पाहिला आणि तो विकत घेतला. त्या ड्रेसची किंमत त्या ड्रेसची किंमत 50 पौंड म्हणजेच 5 हजार रुपये होती.त्या ड्रेसचा फोटो त्याने आपल्या मुलीला पाठवला. युनिक आहे हे T-Shirt, सेलिब्रिटी-श्रीमंतांकडेही नाही; काय आहे यात खास पाहा VIDEO सेसिलियाने ग्रेसला पाठवलेल्या फोटोतील ड्रेसचा रंग व्हाइट-गोल्डन होता. त्यामुळे ग्रेस नाराज झाली. परदेशात फक्त वधूच व्हाईट ड्रेस घालतात, इतर लोक वेगळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असतात. त्यामुळे आपली आई आपल्या लग्नात पांढरा ड्रेस घालणार असल्याने ग्रेसने त्यावर आक्षेप घेतला. तेव्हा सेसिलियाने तो ड्रेस व्हाइट-गोल्डन नाही तर ब्ल्यू-ब्लॅक असल्याचं सांगितलं. तेव्हा ग्रेसने ड्रेसचा फोटो आपल्या होणाऱ्या नवऱ्याला दाखवला. त्यानेही तो ड्रेस काळा-निळा असल्याचं म्हटलं पण ग्रेसचा विश्वासच बसेना. अखेर तिने ड्रेसचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तिथंही दोन मतं झाली. कुणी हा ड्रेस पांढरा-सोनेरी तर कुणी काळा-निळा असल्याचं म्हटलं. लग्नाच्या दिवशी जेव्हा ग्रेसने आईचा ड्रेस प्रत्यक्षात समोरून पाहिला तेव्हा तो तिला निळा आणि काळा दिसला. पण मग फोटोत तो पांढरा-सोनेरी कसा काय दिसला, याचं तिला आश्चर्य वाटलं. या ड्रेसचा फोटो नंतर सर्व सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हा ड्रेस इतका चर्चेत आला की आता त्याचं स्वतंत्र विकीपीडिया पेजही आहे. Expensive Bags : लुईस व्ह्युटॉन, प्राडा, चॅनेल या लक्झरी हँडबॅग्ज इतक्या महाग का असतात? आता कधी व्हाईट-गोल्डन तर कधी ब्ल्यू-ब्लॅक दिसणाऱ्या या ड्रेसमागचं नेमकं रहस्य काय आहे. तर तज्ज्ञांच्या मते, हा ऑप्टिकल इल्युजनचा खेळ आहे. ड्रेसचा रंग प्रत्येकाला वेगळा दिसतो कारण त्यांच्या डोळ्यांना तो रंग कळतो. हा ड्रेस म्हणजे लोकांना रंग कसा समजतो, याचं उत्तम उदाहरण असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.