Bride Groom Pushups Challenge Video: इंटरनेटवर लग्नाशी संबंधित व्हिडीओ (Video Viral) आवडीने पाहिले जातात. लग्नाचे व्हिडीओ अपलोड केल्यानंतर जलद गतीने व्हायरल होतात. यात नवरा-नवरी आपल्या वेगवेगळ्या अंदाजाने लोकांचं लक्ष वेधून घेतात. तुम्ही अनेक लग्नांमध्ये नवरा-नवरीला ग्रँड एन्ट्री घेताना पाहिलं असेल… नवरीला पाहून पाहुणे हैराण… सध्या लग्नाचे व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडीओमध्ये नवरा-नवरी एक चॅलेंज पूर्ण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे नवरीनेही या चॅलेंजमध्ये नवऱ्याला टक्कर दिली. व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल की, लग्नाच्या स्टेजवर नवरीसोबत पूशअप्श चॅलेंज घेताना दिसली. हे ही वाचा- लग्नाच्या स्टेजवर आऊट ऑफ कंट्रोल झाली महिला; जे काही केलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा VIDEO व्हिडीओमध्ये पाहू शकता की, स्टेजवर नवरा-नवरी उपस्थित आहेत. अद्याप एकमेकांना हारही घातलेला नाही. तेव्हाच नवरा-नवरीने काहीतरी ठरवलं आणि दोघांनी एकमेकांना चॅलेंज दिलं. यानंतर सुरू झालं पूशअप्श चॅलेंज…तुम्ही पाहू शकता की, दोघे एका मागोमाग पूशअप्श करतात. नवरदेवासाठी कदाचित हे सोपं असेल, कारण मुलं नियमित अशा प्रकारचा व्यायाम करतात. मात्र कोणाला वाटतंही नसेल की, नवरी इतकी फिटनेट फ्रीक निघाली.
नवरदेवाला दिली टक्कर… व्हिडीओमध्ये पाहू शकता की, नवरीचा पोशाखात तयार झालेली मुलगी स्टेजवरच पुशअप्श सुरू करते. कोणाचाही विचार न करता भर स्टेजवर नवरी मुलगी नवऱ्यासोबत पूशअप्श सुरू करते. हा व्हिडीओ bridal_lehenga_designn नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अपलोड करण्यात आला आहे.

)







