पावसात हेलिकॉप्टर शॉट मारताना खेळाडूचं थेट जमिनीवर लँडिंग, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

या क्रिकटप्रेमीला पावसात क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. तो क्रिकेटच्या प्रेमाखातर चिखलात क्रिकेट खेळण्यासाठी उतरला खरा...

या क्रिकटप्रेमीला पावसात क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. तो क्रिकेटच्या प्रेमाखातर चिखलात क्रिकेट खेळण्यासाठी उतरला खरा...

  • Share this:
    सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ समोर येत असतात. अनेक व्हिडीओ तर तुफान व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक खेळाडू भरपावसात क्रिकेट खेळताना दिसत आहे. पावसाळा सुरू झाला की तरुण मंडळी आवर्जुन पावसात क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल खेळताना दिसतात. मात्र सध्या कोरोनाचा धोका असल्या कारणाने मैदानात नेहमीप्रमाणे मोठी गर्दी दिसत नाही. मात्र या क्रिकटप्रेमीला पावसात क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. तो क्रिकेटच्या प्रेमाखातर चिखलात क्रिकेट खेळण्यासाठी उतरला. क्रिकेट खेळताना त्याने हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या या हेलिकॉप्टर शॉटचं लँडिंग थेट जमिनीवर झालं. एक गिरकी घेत खेळाडू थेट जमिनीवरील चिखलात लँड झालं. या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू रोखता येणार नाही. Lambaddar नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने हेलिकॉप्टर शॉट असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की खेळाडूने उत्साहाने बॅट आकाशात फिरवली. त्यात तो मात्र गोल गिरकी घेऊन खाली कोसळला. या व्हिडीओला लोक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published: