Home /News /viral /

पाकिस्तानातील किराणा दुकानात Money Heist चा 'प्रोफेसर', करतोय पुढील चोरीचा प्लॅन? Photo Viral

पाकिस्तानातील किराणा दुकानात Money Heist चा 'प्रोफेसर', करतोय पुढील चोरीचा प्लॅन? Photo Viral

एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रचंड गाजलेल्या ‘मनी हाइस्ट’ या वेबसीरिजमध्ये (Money Heist) असणाऱ्या ‘प्रोफेसर’ या पात्राशी मिळताजुळता हा फोटो आहे

मुंबई, 08 सप्टेंबर: इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे सगळं जग जोडलं गेलं आहे. तसंच ओटीटी हे नवं करमणुकीचं दालन जगाला उपलब्ध झालं आहे. यात अनेक देशी-परदेशी वेब सीरिज चित्रपट पाहता येतात आणि मग सोशल मीडियावर (Social Media) त्याबाबत चर्चा झडतात. कुणी आवडत्या कलाकारांचे फोटो शेअर करतं तर कुणी या मालिकांतील ‘मीम्स.’ असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रचंड गाजलेल्या ‘मनी हाइस्ट’ या वेबसीरिजमध्ये (Money Heist) ‘प्रोफेसर’ नावाचं एक पात्र आहे. सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असणारा प्रोफेसर अनेकांच्या आवडीचा आहे. दरम्यान प्रोफेसरची कार्बन कॉपी असणारी व्यक्ती पाकिस्तानमध्ये आढळली आहे आणि तिचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याआधी देखील प्रोफेसरच्या लुक्सची तुलना भारतातील अनेक सेलिब्रिटींसह करण्यात आली होती. त्यात विराट कोहली, आयुष्मान खुराना, वरूण धवन यांचाही समावशे होता. हे वाचा-OMG!सोनमच्या घरी आहे तब्बल 18 लाखांचा सोफा; असं आहे लंडनचं आलिशान घर; पाहा Photo मूळ भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने दाढी वाढवली आहे. त्याची वैशिष्ट्यपूर्ण चष्म्याचीच फ्रेम आहे. तसंच त्या अभिनेत्याची देहबोलीही (Body Language) वेगळी आहे. या तिन्ही वर्णनांशी फोटोमधील व्यक्तीच्या लकबी जुळत आहेत. त्याची दाढी आणि चष्म्याची फ्रेमपण तशीच आहे. हा फोटो पाकिस्तानमधील एका किराणा दुकानातील व्यक्तीचा आहे असा दावा फोटो शेअर करणाऱ्याने केला आहे.  त्यामुळे Money Heist चा प्रोफेसर पाकिस्तानात असल्याचं गंमतीत बोललं जातंय. या जगप्रसिद्ध सीरिजचा पाचवा सीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. नेटकऱ्यांच्या अजब प्रतिक्रिया या फोटोला मिळत आहेत. ‘प्रोफेसरचं पाकिस्तान कनेक्शन,’ असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे तर दुसरा म्हणतो, ‘प्रोफेसरने पाकिस्तानात किराणा दुकान टाकलंय.’ आणखी एक चाहता लिहितो, ‘मनी हाइस्टमधल्या प्रोफेसरचा जुळा भाऊ पाकिस्तानात सापडला आहे.’ या मूळ स्पॅनिश मालिकेचं नाव ‘La casa de papel’ असं असून त्यांचं इंग्रजी नाव मनी हाइस्ट ठेवण्यात आलं आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर प्रतिक्रिया देऊन त्याचा आनंद लुटत आहेत. काही जण तर असं म्हणत आहेत प्रोफेसर त्याच्या पुढील चोरीचा प्लॅन करत आहे. हे वाचा-आता येणार 'मराठी Indian Idol'; प्रेक्षकांची उत्कंठा वाढली मनी हाइस्ट ही सीरिज आता जगभर पाहिली जाते आहे. यातील अभिनेत्यांनी केलेल्या अभिनयामुळे तसंत तिच्या उत्कंठावर्धक कथानकामुळेही ती जनमानसात लोकप्रिय होत आहे. पाचवा सिझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. या आधीच्या चार भागांना जसा लोकांनी प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद पुढेही मिळेल अशी अपेक्षा निर्मात्यांना नक्की असेल. फक्त आता या भागाला किंवा सिझनला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे बघावं लागेल.
First published:

Tags: Netflix

पुढील बातम्या