जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शस्त्रक्रियेनंतर महिला पत्रकाराचं नाव Guinness Book मध्ये; World Record च कारण ऐकून लोक हैराण!

शस्त्रक्रियेनंतर महिला पत्रकाराचं नाव Guinness Book मध्ये; World Record च कारण ऐकून लोक हैराण!

शस्त्रक्रियेनंतर महिला पत्रकाराचं नाव Guinness Book मध्ये; World Record च कारण ऐकून लोक हैराण!

ही महिला पत्रकार (Bengaluru Lady Journalist) मात्र स्वतःच एका विक्रमाच्या बातमीचा विषय झाली.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    बंगळुरू, 25 एप्रिल : पत्रकारांना वेगवेगळ्या विषयांच्या बातम्या लिहाव्या लागतात. त्यातलाच एक विषय म्हणजे कोणीही कशाचाही केलेला विक्रम. बेंगळुरूतली एक महिला पत्रकार (Bengaluru Lady Journalist) मात्र स्वतःच एका विक्रमाच्या बातमीचा विषय झाली. रितिका शर्मा (Ritika Sharma) असं या 34 वर्षांच्या महिलेचं नाव आहे. तिच्या शरीरावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तिच्या शरीरातून तब्बल 236 फायब्रॉइड्स (Fibroids) काढून टाकण्यात आले. ‘Most Fibroids Removed’ अर्थात शरीरातून काढण्यात आलेले सर्वाधिक फायब्रॉइड्स यासाठी रितिकाचं नाव गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness Book of World Records) नोंदवण्यात आलं. सक्रा वर्ल्ड हॉस्पिटलमध्ये रितिकावर ही शस्त्रक्रिया झाली. तिच्या शरीरातून काढण्यात आलेल्या सर्व फायब्रॉइड्सचं एकत्रित वजन 2250 ग्रॅम्स एवढं होतं. त्यापैकी एक फायब्रॉइड एखाद्या कॉलिफ्लॉवरच्या आकाराचा होता. या फायब्रॉइड्समुळे रितिकाचं पोट इतकं मोठं झालं होतं, की ती गर्भवती असल्यासारखी वाटत होती. तसंच, तिला मासिक पाळीच्या वेळी क्रॅम्प्स येण्याचा त्रासही होत होता. तिच्यावर चार-साडेचार तासांची शस्त्रक्रिया करून हे फायब्रॉइड्स बाहेर काढण्यात आले. डॉ. संथाला थुप्पण्णा (Dr Santhala Thuppanna) यांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरनी सांगितलं, ‘या महिलेच्या शरीरातले सर्व 236 फायब्रॉइड्स आम्हाला काढून टाकता आले, ही आनंदाची गोष्ट आहे. ही सर्जरी गुंतागुंतीची होती. कारण ते फायब्रॉइड्स तिच्या युरिनरी ब्लॅडरच्या आणि मूत्रमार्गाच्या खाली होते. तसंच तिच्या युटेरसच्या डाव्या बाजूला पूर्णपणे पसरले होते. शरीरातले महत्त्वाचे अवयव ज्या भागात असतात, तिथेच हे असल्यामुळे ते सगळं कठीण होतं. आज ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली म्हणून आनंद आहे; पण महिलांनी अशा प्रकारच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करून ती दुखणी अंगावर काढू नयेत, असं आवाहन या निमित्ताने करू इच्छितो. कारण त्यामुळे गुंतागुंत अधिक वाढू शकते.’ हे ही वाचा- कर्नाटकात हिजाबनंतर आता नवा वाद! विद्यार्थ्यांना शाळेत बायबल घेऊन जाणं बंधनकारक केल्यानं गोंधळ रितिकाने सांगितलं, ‘ही गुंतागुंतीची सर्जरी यशस्वी झाली, याचा मला आनंद आहे. सर्व डॉक्टर्सबद्दल माझ्या मनात कृतज्ञता आहे.’ युटेराइन फायब्रॉइड्स म्हणजे युटेरसच्या (अर्थात महिलांचं गर्भाशय) भागात तयार होणाऱ्या गाठी. या गाठी नॉन-कॅन्सरस असतात, म्हणजे कॅन्सरच्या नसतात. बऱ्याचदा अशा गाठी महिलांच्या प्रजोत्पादनशील काळात होतात. त्यांना फायब्रॉइड्स, मायोमाज, फायब्रोमाज, युटेराइन मायोमाज अशी बरीच नावं आहेत. या गाठी युटेराइन कॅन्सरमध्ये (Uterine Cancer) रूपांतरित होत नाहीत. या गाठी जननेंद्रियाच्या (Reproductive Parts) सर्व भागांत पसरण्याची स्थिती फारच दुर्मीळ असते, असं तज्ज्ञ सांगतात. अभ्यासातून असं स्पष्ट झालं आहे, की जगातल्या 80 टक्के महिलांना वयाची पन्नाशी गाठेपर्यंत फायब्रॉइड्सची समस्या भोगावी लागते. त्यापैकी बहुतांश जणींमध्ये काही ठळक लक्षणं दिसत नाहीत. पोटात, ओटीपोटात प्रचंड दुखणं आणि पाळीच्या वेळी प्रचंड रक्तस्राव होणं ही लक्षणं गंभीर रुग्णांमध्ये दिसतात; मात्र केवळ फायब्रॉइड्सशी निगडित असलेली अशी कोणतीही बाह्य लक्षणं नसतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात