मुंबई, 15 जानेवारी : तुम्ही WWE पाहिलं असेल किंवा पाहतही असाल. यामधील रेसलर किती हट्टेकट्टे असतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. या पहलवानांसमोर सामान्य माणसांची ताकद काहीच नाही. पण एका आजीबाईने मात्र अशा WWE रेसलरची अक्षरशः वाट लावली आहे. अवघ्या काही सेकंदात तिने या रेसरला गार केलं आहे. WWE रेसलरला मारणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओ तुम्ही पाहू शकता एक पहलवान जमिनीवर आडवा झालेला दिसतो आहे आणि एक वृद्ध महिला त्याच्यावर उभी आहे. हा WWE रेसरल आहे टोनी एटलस. पण त्याची अशी अवस्था पाहून त्याचे चाहतेही हैराण झाले आहेत. हे वाचा - बुलाती है मगर जाने का नहीं! सौंदर्य पाहून हिच्या मागे मागे जाल तर…; VIDEO च्या शेवटी आहे खतरनाक सत्य व्हिडीओत तुम्ही पाहू शकता इतक्या बलवान पहलवानाला ही हडकुळी महिला मारताना दिसते आहे आणि हा रेसरल काहीच करू शकत नाही आहे. महिला सलग आपल्या हाताच्या बुक्क्यांनी त्याच्या चेहऱ्यावर मारत राहते. तुम्ही मोजलात तर फक्त 26 सेकंदात तिने तब्बल 50 मुक्के मारले आहेत. बरं ती इथवरच थांबली नाही तर यानंतर ती बूट असलेल्या पायांनी त्याच्या चेहऱ्यावर लाथाही मारताना दिसते. तेव्हा तर आपल्याला धक्काच हसतो.
68 वर्षांचा WWE रेसलर टोनी एटलसने आपला हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्याला मारणारी ही महिला कोण आहे हे मात्र या व्हिडीओत सांगितलं नाही आहे. हे वाचा - दारुड्या अमितची चांगलीच उतरली; पत्नी, आई आणि बहिणीने धू धू धुतलं VIDEO व्हिडीओच्या शेवटी टोनी हॅप्पी न्यू इअर बोलताना दिसतो. त्यामुळे या व्हिडीओतील मारहाण म्हणजे खरीखुरी नव्हे तर मनोरंजनासाठी कऱण्यात आल्याचं दिसतं आहे.