जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दारुड्या अमितची चांगलीच उतरली; पत्नी, आई आणि बहिणीने धू धू धुतलं VIDEO

दारुड्या अमितची चांगलीच उतरली; पत्नी, आई आणि बहिणीने धू धू धुतलं VIDEO

व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे पोलीस तपासासाठी पोहोचले. प्रकरण कौटुंबिक होतं. त्यामुळे पोलीस माघारी परतले.

व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे पोलीस तपासासाठी पोहोचले. प्रकरण कौटुंबिक होतं. त्यामुळे पोलीस माघारी परतले.

व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे पोलीस तपासासाठी पोहोचले. प्रकरण कौटुंबिक होतं. त्यामुळे पोलीस माघारी परतले.

  • -MIN READ Trending Desk Uttar Pradesh
  • Last Updated :

    हरदोई, 15 जानेवारी : अनेकांना दारू पिण्याचं वाईट व्यसन असतं. ते दारू प्यायल्यानंतर घरातल्या माणसांना त्रासही देतात. काही जण तर दारूच्या नशेत घरातल्या सदस्यांना शिवीगाळ करतात आणि मारहाणही करतात. त्यांचं दारू पिणं आणि त्रास सहन करत राहतात; पण बऱ्याचदा अशा व्यक्तींच्या घरातल्या सदस्यांचा संयम कधी तरी सुटतो आणि ते त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात हरदोईमध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशातल्या हरदोईमध्ये दारूच्या नशेत घरी पोहोचलेल्या तरुणाला त्याची पत्नी, त्याची आई, बहीण आणि इतर महिलांनी मिळून काठ्यांनी बेदम मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा कोणीतरी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं; पण संबंधिताने तक्रार दिल्यास मारहाण करणाऱ्या महिलांवर कारवाई केली जाईल, असं स्टेशन ऑफिसरने सांगितलं.

    कछौना परिसरातील भानपूर गावात राहणारा अमित अवस्थी हा बालामऊ रेल्वेगंज इथं भाड्याने राहतो आणि एका खासगी दुकानात काम करतो. अमित रोज दारूच्या नशेत घरी पोहोचायचा आणि सर्वांना त्रास द्यायचा. शुक्रवारी अमित दारूच्या नशेत घरी पोहोचला असता त्याची पत्नी शिखा हिने नणंद व सासूसह मिळून त्याला काठ्यांनी बेदम मारहाण केली. ( लग्नाआधी नवरदेवाचा पाय झाला फ्रॅक्चर; स्टेजवरच नवरीने केलं असं काम की पाहुणेही भावुक..VIDEO ) यादरम्यान, शेजारीही अमितला वाचवण्यासाठी पोहोचले; मात्र घरातल्या महिलांनी सर्वांना तिथून परत पाठवलं आणि नंतर अमितला बेदम मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवून कोणी तरी सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे पोलीस तपासासाठी पोहोचले. प्रकरण कौटुंबिक होतं. त्यामुळे पोलीस माघारी परतले. हे प्रकरण कौटुंबिक वादाचं होतं. त्यामुळे आम्ही फक्त व्हिडिओच्या आधारे कोणतीही कारवाई करणार नाही. संबंधिताने तक्रार दिल्यास मारहाण करणाऱ्या महिलांवर कारवाई केली जाईल, असं स्टेशन ऑफिसर विका जायस्वाल यांनी सांगितलं. (चिडलेल्या हत्तीने थेट पिक-अप केला उलटा, Shocking Video पाहून नेटकरी अवाक्) अमितला दारू पिण्याची सवय असल्याने त्याच्या कुटुंबातल्या व्यक्ती त्रासल्या होत्या. तो दारू पिऊन घरातल्यांनाना त्रास द्यायचा. बायको, बहीण व त्याची आईही त्याच्या सवयीला कंटाळले होते. त्यामुळे या वेळी अमित दारू पिऊन घरी आल्यावर त्यांनी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला मारहाण केली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर प्रतिक्रियाही येत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात