वॉशिंग्टन, 28 मे : एका बॉलिवूड फिल्ममध्ये तुम्ही जादू की झप्पीची कमाल पाहिलीच असेल. पण रिअल लाइफमध्येही या जादू की झप्पीने जबरदस्त कमाल दाखवली आहे. मिठी मारल्याने एक मोठी घटना टळली आहे. जादू की झप्पीचा असा परिणाम पाहून पोलीसही चक्रावले. हे अजब प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. प्रेमाने जग जिंकता येतं, असं म्हणतात. ते खोटं नाही, हे या प्रकरणातून सिद्ध झालं आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील हे प्रकरण. इथल्या बँक ऑफ द वेस्टमध्ये दरोडा पडला. एक व्यक्ती बँक लुटण्यासाठी आली. मास्क घातलेली ही व्यक्ती कॅश काऊंटवरवर कर्मचाऱ्याला धमकी देत होती. आपल्या बॅगमध्ये बॉम्ब आहे, पैसे दिले नाही तर आपण बॉम्ब ब्लास्ट करू अशी धमकी तो देत होता. हे ऐकून बँकेतील सर्वांना धक्का बसला, सर्व घाबरले.
69 वर्षांचे माइकल आर्मस नावाची व्यक्तीही त्यावेळी बँकेत होती. ते तिथं चेक जमा करायला आले होते. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. पण ते घाबरले नाहीत. उलट स्वतः आपला जीव धोक्यात टाकत ते स्वतः त्या दरोडेखोर व्यक्तीजवळ गेले आणि त्याच्यासोबत बोलू लागले. त्यांनी त्याला आपण त्याचा जुना शेजारी असल्याचं सांगितलं आणि त्याच्याकडे नोकरी आहे की नाही हे विचारणा केली. त्यावेळी दरोडेखोर या शहरात माझ्यासाठी काहीच नाही, मला जेलमध्ये जायचं आहे, असं म्हणाला. VIDEO - रक्षकासमोर भक्षक नमला! देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकासमोर किंग कोब्राने स्वतःच पत्करली हार माइकल यांनी संशयित दरोडेखोराला मिठी मारली, त्याला आपल्यासोबत बोलण्यात व्यस्त ठेवलं. त्यावेळी तोसुद्धा इमोशनल झाला. तोपर्यंत पोलीसही बँकेत आले. त्यांनी त्याला अटक केली. मीडिया रिपोर्टनुसार पोलीस चौकशीत त्या संशयित दरोडेखोराचं नाव एडुआर्डो प्लेसेन्सिया असल्याचं समजलं. तो ४२ वर्षांचा आहे. आपल्याकडे कोणतंही विस्फोटक नव्हतं आपण फक्त धमकावून, घाबरून पैसे लुटण्याचे प्रयत्न करत होतो, असं त्याने सांगितलं. दरम्यान पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल आहे. शाब्बास रे पठ्ठ्या! मुलाला तुडवत गेली घोडी, पण बैलाने वाचवलं; पुण्यातील थरारक VIDEO अधिकाऱ्यांनी माइकल यांच्या हिमतीचं कौतुक केलं आहे. एडुआर्डोच्या अटकेनंतरही माइकल आता त्याला भेटण्याच्या तयारीत आहे.