Home /News /viral /

वॉट अ टॅलेंट सरजी! पैसे दुपटीचा कमालीचा फॉर्म्युला; 100 चे 200 रुपये कसे केले पाहा VIDEO

वॉट अ टॅलेंट सरजी! पैसे दुपटीचा कमालीचा फॉर्म्युला; 100 चे 200 रुपये कसे केले पाहा VIDEO

आपल्या डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच 100 रुपयांची नोट 200 रुपयांमध्ये बदलते.

  मुंबई, 16 जुलै: आपल्याकडे असलेले पैसे दुप्पट (Double money) करण्यासाठी बहुतेकांची धडपड सुरू असते. काही ठिकाणी पैसे गुंतवून अगदी कमीत कमी वेळेत जास्त पैसे (Money) कमवण्याकडे लोकांचा कल असतो. सध्या पैसे दुपटीचा असाच एक मजेशीर (Funny Video) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यात एका व्यक्तीने घरबसल्या काही सेकंदाचत पैसे दुप्पट करून दाखवले आहेत. सोशल मीडियावर व्यक्तीने 100 रुपयांच्या नोट 200 रुपयांच्या नोटेत बदलून दाखवली आहे. तेसुद्धा फक्त काही सेकंदात.
  सध्या नोटांचा रंग वेगवेगळा आहे. रंगांनी नोट ओळखली जाते. 100 रुपयांची नोट जांभळ्या रंगाची, 200 रुपयांची नोट पिवळ्या रंगाची, 2000 रुपयांची नोट गुलाबी रंगाची आहे आणि नोटांना दिल्या जाणाऱ्या रंगावरूनच या व्यक्तीने आपलं डोकं चालवलं.  त्याने 100 रुपयांची एक नोट घेतली आणि त्यावर हळद टाकून पिवळी 200 रुपयांची नोट बनवली. काय मग आहे की नाही जादू? पैसे दुप्पट करण्याचा कमालीचा फॉर्म्युला.  हा व्हिडीओ मजेशीर आहे. पण या व्यक्तीच्या टॅलेंटला मात्र दाद द्यायला हवी. हे वाचा - अरे हे काय सुरू आहे कुणी सांगेल? Wedding video पाहून नेटिझन्सना पडला प्रश्न आतापर्यंत पैशांसोबत केलेली तुम्ही असे बरेच जादूचे व्हिडीओ पाहिले असतील. पण असा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहिला असेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया येत आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Funny video, Money, Viral, Viral videos

  पुढील बातम्या