मुंबई,2 मार्च : सध्या देशभरातल्या सोशल मीडियात एका व्हिडीओची मोठी चर्चा आहे. हा व्हिडीओ आहे फक्त 27 सेकंदांचा. पण या 27 सेकंदात जे सामावलं आहे, ते 27 ओळींमध्ये सुध्दा मांडणं कठीण आहे. कारण या व्हिडीओत जी धडपड आहे, या व्हिडीओ पाहून मनाची जी घालमेल होते, धाकधूक वाढते ती शब्दांत मांडताच येणार नाही. ही भावना शब्दातीत आहे. ही घालमेल आहे एका आईची. घालमेल आहे एका मुक्या जिवाची. घालमेल आहे एका पक्षाची, आपल्या पिल्लांसाठी. काही तासांची पिल्लं, ज्यांनी अजून जगातलं काहीही पाहीलेलं नाही. ना पाहिला सूर्य, ना पाहिला चंद्र, ऊन, पाऊस, थंडी काय असते हे सुद्धा ज्यांना माहीत नाही. अशा पिल्लांसाठी सुरु आहे आईचा संघर्ष आणि तोसुद्दा थेट काळाशी.
All the forces on this planet, will never beat that of a mothers love.
— Susanta Nanda (@susantananda3) March 1, 2020
Wood pecker saving its chicks after a fierce air duel with the snake👍🏻 pic.twitter.com/mvBo7OWN74
पण 27 केसंदाच्या या व्हिडीओचा शेवट मात्र कोणालाच माहीत नाही. आणि या व्हिडीओचा शेवट सकारात्मक व्हावा असं कोणालाही वाटतंय. पण साप बरोबरचा एका आईचा संघर्ष यशस्वी झाला का नाही हे मात्र कोणालाच माहीत नाही. पण सापचा पराभव झाला असावा, असं हा व्हिडीओ पाहताच तुमच्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही. तेंव्हा हा व्हिडीओ पाहा… आणि शेवट चांगलाच असेल अशी प्रार्थना करा. अन्य बातम्या तरुणाने स्वत:ची चिता पेटवली आणि त्यावरच झोपला, लोकांनी शूट केला VIDEO जीवघेणा खेळ, tik tok करताना शूट झाला तरुणाच्या मृत्यूचा थरारक LIVE VIDEO

)








