पॅरिस, 12 नोव्हेंबर : नाक कुठे असतं, असं विचारलं तर अगदी नुकतंच बोलू लागलेलं चिमुकलंसुद्धा तोंडावर म्हणेल. प्रत्येक माणूस एकमेकांपेक्षा दिसायला वेगळा असला तरी त्याची शारीरिक रचना ही सारखीच असते. म्हणजे नाक, कान, डोळे असे प्रत्येक अवयव शरीराच्या एका ठराविक भागावर असतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका महिलेच्या चेहऱ्यावर नाक नव्हतं पण तिच्या हातावर होतं. फ्रान्समधील हे विचित्र प्रकरण आहे. फ्रान्समधील या महिलेच्या चेहऱ्यावरील नाक गायब झालं आणि चेहऱ्याऐवजी हातावर नाक आलं. आता हे कसं शक्य आहे? तर हा डॉक्टरांचा चमत्कार. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार या महलेला कॅन्सर होता. तिला नेझल कॅव्हिटी कॅन्सर झाला होता. नेझल कॅव्हिटी कॅन्सर झालेल्या रुग्णांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. रुग्णांच्या नाकाच्या आसपाचं कार्य थांबतं. काही प्रकरणात रुग्ण आपलं नाक गमावतात. या महिलेसोबतसुद्धा हेच झालं होतं. तिने आपलं नाक गमावलं होतं. नाकामार्फत कॅन्सर शरीरात पसरण्याचा धोका होता त्यामुळे 2013 साली तिचं ऑपरेशन झालं तेव्हा तिचा जीव वाचवण्यासाठी तिचं नाक काढण्यात आलं. हे वाचा - आश्चर्य! हाडामांसाऐवजी चक्क ‘प्लॅस्टिकचं बाळ’; महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही शॉक तेव्हापासून ही महिला नाकाशिवाय आयुष्य जगत होती. अखेर तिने नाक ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला. आता तुम्ही हार्ट, लिव्हर, किडनी अशा अवयवांच्या ट्रान्सप्लांटबाबत ऐकलं असेल. शरीराच्या बाहेरील हात-पाय असा एखादा आर्टिफिशिअल अवयव बसवल्याचं पाहिलं असेल. पण नाकाच्या प्रत्यारोपण कधी ऐकलं आहे का? शिवाय अवयव प्रत्यारोपणात ब्रेनडेड रुग्णाच्या शरीरातील अवयव घेतले जातात. पण आता नाक प्रत्यारोपण करायचं म्हणजे नेमकं काय केलं असेल, हे नाक कसं प्रत्यारोपित केलं असेल. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या महिलेला कुणा दुसऱ्या व्यक्तीचं किंवा तिला आर्टिफिशिअल नाकही लावण्यात आलं. तर तिचं नाक तिच्या हातावर निर्माण करण्यात आलं. 3 डी प्रिटिंगच्या मदतीने तिच्या हातावर नाकाची निर्मिती केली आणि मग ते तिच्या चेहऱ्यावर लावलं. या प्रक्रियेत महिलेच्या हातावरील नाक झाकण्यासाठी स्किन ग्राफ्टचा वापर करण्यात आळा. दोन महिने तिच्या हातावरच नाक वाढलं. त्यानंतर ते चेहऱ्यावर ट्रान्सप्लांट करण्यात आलं. हे वाचा - सावधान.! मुतखड्याचं ऑपरेशन करण्यासाठी गेलेल्या होमगार्डची किडनी केली गायब तिचं नाक आधी जसं होतं, तसंच करण्याचा प्रयत्न केला आणि ते यात यशस्वीही झाले. म्हणजे डॉक्टरांनी महिलेच्या हातावर नाकाची निर्मिती केली आणि मग सर्जरी करून ते तिच्या चेहऱ्यावर जोडलं. मेडिकल सायन्सची कमाल पाहून जग हैराण झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.