मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ज्यांनी टोपी काढली त्यांनाच 'टोपी घातली'; इमोशनल VIDEO मध्ये जबरदस्त ट्विस्ट

ज्यांनी टोपी काढली त्यांनाच 'टोपी घातली'; इमोशनल VIDEO मध्ये जबरदस्त ट्विस्ट

या व्हिडीओत शेवट असा आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

या व्हिडीओत शेवट असा आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

या व्हिडीओत शेवट असा आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 10 ऑगस्ट : अनेकदा असं होतं की आपण कुणाला तरी फसवायला जातो आणि आपणच फसतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. जो थोडा इमोशनल (Emotional video) आणि थोडा मजेशीर (Funny video) असा आहे. या व्हिडीओत शेवट असा आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. यामध्ये जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो (Cap video).

एका व्यक्तीला रस्त्यावर काही तरुण सतावतात. बिचारा हतबल होतो अखेर या तरुणांसमोर तो हार मानून गप्पपणे तिथून निघून जातो. व्हिडीओ पाहून आपल्यालाही वाईट वाटतं पण व्हिडीओचा शेवट असा आहे की तुम्हाला हसू बिलकुल आवरणार नाही.

व्हिडीओत पाहू शकता एक वयस्कर व्यक्ती रस्त्यावरून जाते आहे. तितक्यात त्याच्यासमोरून एक तरुण येतो. तो या व्यक्तीच्या डोक्यावरील टोपी काढून घेतो. वयस्कर व्यक्ती आपली टोपी मिळवण्यासाठी धडपड करते. तसं तो तरुण ती टोपी दुसऱ्या तरुणाकडे भिरकावतो. वयस्कर व्यक्ती आपल्या टोपीसाठी धावत त्या तरुणाकडे जाते, त्याच्याकडूनही टोपी मिळवण्यासाठी धडपडते. तसं तो तरुणही ती टोपी तिसऱ्या तरुणाकडे भिरकावतो. बिचारा वयस्कर व्यक्ती तिसऱ्या तरुणाकडूनही टोपी परत मिळवण्यासाठी धडपडताना दिसतो. अखेर तो हतबल होऊन हार मानतो आणि तिथून टोपीशिवायच गप्पपणे निघून जातो. ते तरुणसुद्धा आपल्या मार्गाने निघून जातात.

हे वाचा - VIDEO - भुंकत धावत आले कुत्रे आणि...; सिंह, अस्वल बनून घाबरवणं पडलं महागात

वयस्कर व्यक्तीसोबत जे काही घडतं ते पाहून आपल्याला वाईट वाटतं आणि त्या तरुणांचा राग येतो. वृद्ध व्यक्ती पुढे जाऊन एका दगडावर बसते आणि आपल्या खिशात हात टाकून काहीतरी बाहेर काढते. त्या व्यक्तीच्या हातात चक्क तीन तीन मोबाईल असतात. ज्याकडे पाहून तो हसतो. समजलं का काही. ज्या तरुणांनी या व्यक्तीची टोपी काढून घेतली, त्यांनाच या व्यक्तीने टोपी घातली आहे. जेव्हा तो आपली टोपी मिळवण्यासाठी धडपडत होतो तेव्हा त्या तरुणांना हात लावून त्यांचे खिसे चाचपून त्याने त्यांचे मोबाईल काढून घेतले आणि तरुणांना त्याची माहितीही पडली नाही.

हे वाचा - फणा VS पंजा; मांजर आणि सापातील जबरदस्त फायटिंगचा थरार; पाहा VIDEO

हा सर्व घडलेला प्रसंग तिथं बसून पाहत होतं ते एक माकडे. सुरुवातीला तोसुद्धा थोडा गंभीरच असतो. पण शेवट पाहून तोसुद्धा खदखदून हसू लागतो. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos