मुंबई, 24 सप्टेंबर : वाहनधारकांना (Car) सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती म्हणजे पार्किंगची. कुठे बाहेर गेल्यानंतर गाडी पार्क (Car video) कुठे करायची हा प्रश्न असतोच. पण अनेकदा घराजवळही गाडी पार्क (Car parking) करण्यात अडचण येते. पार्किंगची (Car parking video) सोय नसते किंवा असली तरी जास्त गाड्या किंवा कमी जागा अशी काही ना काही अडचण असते. पण एका व्यक्तीने तर मात्र यावर मार्ग शोधून काढला आहे. अगदी कमीत कमी जागेत त्याने पार्किंग करून दाखवली आहे. पार्किंगसाठी व्यक्तीने केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. पार्किंगचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही चक्रावून द्याल. अशी भन्नाट आयडिया या व्यक्तीने शोधून काढली आहे. व्हिडीओ पाहताच तुम्ही व्हॉट अॅन आयडिया सरजी असंच म्हणाल. आता नेमकं या व्यक्तीने इतकं केलं तरी काय आहे, ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.
व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती गाडी पार्क करायला येते. सुरुवातीला जागा पाहून आपल्यालाही प्रश्न पडतो की ही व्यक्ती नेमकी गाडी पार्क कुठे आणि कशी करणार. हे वाचा - VIDEO- आजी रॉक्स बाकी सगळे शॉक! 3 महिन्यांत शिकली ड्रायव्हिंग, हायवेवर पळवली कार व्यक्ती आपली गाडी मागे घेते आणि कारच्या आकाराच्या एका स्टँडवर चढवते. त्यानंतर व्यक्ती गाडीतून खाली उतरते आणि स्वतःच्या हाताने गाडीला धक्का मारून गाडी सरकवते आणि जिन्याच्या खाली टाकते. स्टँड हे मुव्हिंग असल्याने त्याला गाडी हलवणं अगदी शक्य होतं. जिन्याच्या खाली कमीत कमी जागेत ही व्यक्ती गाडी पार्क करते. जे आपल्याला पाहून अशक्य वाटत होतं, ते या व्यक्तीने आपल्या डोळ्यासमोर करून दाखवलं. जुगाडू लाइफ हॅक या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - आनंद महिंद्रा यांना सापडला खरा Iron man; VIDEO मध्ये मुलाचं टॅलेंट पाहून झाले इम्प्रेस याआधीसुद्धा कार पार्किंगचा असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात एका व्यक्तीने रस्त्यावर आपण विचारही करू शकत नाही अशा जागेवर कार पार्क केली.
या व्हिडीओमध्ये अगदी कमी जागेत मोठी पार्क केलेली कार योग्य कौशल्य दाखवत एका तरुण बाहेर काढतो आहे. अगदी कमी जागेतही नीट गाडी पार्क करणं आणि तिथून पुन्हा नीट रस्त्यावर आणणं यासाठी कौशल्याएवढाच आत्मविश्वासही असावा लागतो असं कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.