भोपाळ, 23 सप्टेंबर : Age is just a Number, वय हा केवळ एक आकडा आहे, असं अनेक जण म्हणतात. शिवाय शिकण्याला काही वय नसतं, असंही म्हटलं जातं. हेच सिद्ध करून दाखवलं आहे, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) 95 वर्षांच्या आजीने (Madhya Pradesh grandmother). ज्या वयात अनेक गोष्टी करण्याची भीती वाटते, हातपाय थरतात त्याच वयात या आजीने चक्क गाडीचं स्टेअरिंग हातात घेतलं आहे (Grandmother driving car). मध्य प्रदेशच्या देवासमधील (Dewas) बिलावलीत राहणाऱ्या 95 वर्षांच्या रेशम बाई तन्वर (Resham Bai Tanwar) अशी कार चालवतात की पाहून तरुणही थक्क झाले आहेत. ड्रायव्हिंग करणाऱ्या या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. महत्त्वाचे म्हणजे या आजी फक्त तीन महिन्यांतच गाडी चालवायला शिकल्या आहेत. तीन महिन्यांत ड्रायव्हिंग शिकून त्यांनी हायवेवर सुसाट कार पळवली आहे.
A 95-year-old woman from Dewas Resham Bai Tanwar learned to drive a car from her son in less than three months, and now she drives on a busy highway @ndtv @ndtvindia @GargiRawat @umasudhir @manishndtv @Monideepa62 @MayaSharmaNDTV @rohini_sgh pic.twitter.com/H0Y44XdcoH
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) September 23, 2021
अनुराग द्वारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार आजी आपल्या मुलाकडून तीन महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत गाडी चालवायला शिकल्या आणि त्यांनी रहदारी असलेल्या हायवेवर कार चालवली. हे वाचा - VIDEO - गरगर…गरगर… एका शिंगावर फिरवला टब; म्हशीचं स्टंट पाहून व्हाल थक्क सर्वसामान्यपणे एका ठराविक वयानंतर काही नवीन गोष्टी करण्यास भीती वाटते किंवा काही गोष्टी विसरल्या जातात. पण या आजी याला अपवाद ठरल्या. या आजीचा आत्मविश्वास, जिद्द अतिशय तगडी असून तिने या वयात कार चालवत सर्वांसाठीच एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवलं आहे. एखादी गोष्ट मनाशी पक्की केली, ठरवली की, कोणतीचं गोष्ट अवघड नसते. हेच या आजीने सिद्ध केलं आहे. रेशम आजी फक्त गाडी चालवण्यातच नाही तर अँड्रॉईज मोबाईल चालवण्यातही तरबेज आहेत. त्यांना तीन मुलं आणि दोन मुली अशी पाच मुलं आहेत. सर्वांची लग्न झाली आहेत. त्यांचा एक मुलगाच 55 वर्षांचा आहे. तर त्यांची नातवंडं 25-30 वर्षांची आहेत. या वयातही रेशम स्वतःची कामं स्वतः करतातच, शिवाय घर आणि शेतातील कामंही करतात. हे वाचा - शंभरीतही विशीतील जोश! 100 वर्षांची आजी जगातील सर्वात वयस्कर पॉवरलिफ्टर याआधी महाराष्ट्रातील आजीबाईंनीही अशीच कार चालवली होती. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील दहागाव खेड्यात राहणाऱ्या 89 वर्षांच्या आजीने कार चालवण्याची किमयाच केली आहे. कधीही कारमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूलाही न बसलेल्या आजीने या वयातही आत्मविश्वास, जिद्द, आवड, आपल्या हौशेच्या जोरावर कार चालवली आहे.
आजीचा नातू विकास भोईर याने आजीला जवळपास 3 ते 4 वर्षांपूर्वी गाडी चालवायला शिकवलं होतं. त्यावेळी आजी काहीशी आजारी असताना नातवाने तिला गाडी चालवणार का? असा प्रश्न केला. आजीनेही लगेच तयारी दाखवली आणि नातवाने तिला क्लच, गिअर, ब्रेक, स्टेअरिंग, एक्सलेटर सगळ्याची माहिती करून होती. त्या 3-4 वर्षांनंतर मात्र तिने गाडी हातात घेतली नव्हती. अचानक पुन्हा नातवाने आजीला गाडी चालवणार का विचारलं आणि आजी लगेचच तयार झाली. आश्चर्याची बाब म्हणजे, 3-4 वर्षांपूर्वी शिकवलेलं तिला सगळं आठवत होतं, माहिती होतं. आजीने पुन्हा गाडी चालवली आणि नातवाने अभिमानाने आजीचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया चांगलाच व्हायरल झाला.