मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नाच्या 8 वर्षांनंतर पडली प्रेमात; पतीने घटस्फोट देऊन पत्नीचं लावलं दुसरं लग्न

लग्नाच्या 8 वर्षांनंतर पडली प्रेमात; पतीने घटस्फोट देऊन पत्नीचं लावलं दुसरं लग्न

1999 मध्ये 'हम दिल दे चुके सनम' नावाचा चित्रपट आला होता. यातही पती पत्नीचं लग्न लावून देतो. मात्र येथे तर लग्नाच्या 8 वर्षांनंतर पतीने इतकं मोठं पाऊल उचललं.

1999 मध्ये 'हम दिल दे चुके सनम' नावाचा चित्रपट आला होता. यातही पती पत्नीचं लग्न लावून देतो. मात्र येथे तर लग्नाच्या 8 वर्षांनंतर पतीने इतकं मोठं पाऊल उचललं.

1999 मध्ये 'हम दिल दे चुके सनम' नावाचा चित्रपट आला होता. यातही पती पत्नीचं लग्न लावून देतो. मात्र येथे तर लग्नाच्या 8 वर्षांनंतर पतीने इतकं मोठं पाऊल उचललं.

  • Published by:  Meenal Gangurde
इंदूर, 13 ऑगस्ट : चित्रपटातील घटना प्रत्यक्षात घडली तर तुम्ही त्यावर विश्वास करू शकाल का? मध्य प्रदेशातील इंदूर (Indore News) जिल्ह्यातील एक अजब प्रेम कहाणी समोर आली आहे. येथे पत्नीला लग्नाच्या 8 वर्षांनंतर दुसऱ्या तरुणाशी प्रेम झालं, जेव्हा याबाबत तिच्या पतीला कळालं तर संताप व्यक्त करण्याऐवजी त्याने पत्नीला घटस्फोट दिला व त्यांना लग्न करण्यास कोणताही अडथळा ठेवला नाही. या घटनेत पतीने ज्या प्रकारे वागणूक दिली आहे, ते पाहून अनेकांनी त्याला सलाम केला आहे. आतापर्यंत आपण विवाहबाह्य संबंधात हत्येच्या आणि वादाच्या बातम्या पाहत आलो आहे. मात्र ही घटना वेगळी आहे. या पतीने अत्यंत मोठ्या मनाने पत्नीच्या आनंदासाठी तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. (Fell in love after 8 years of marriage husband divorced his wife and remarried with another man) मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीची पत्नी प्रियकरासोबत लग्न करू इच्छित होती. हैराण करणारी बाब म्हणजे लग्नाच्या 8 वर्षात त्यांची 5 वर्षांची मुलगीदेखील आहेत. या प्रकरणात कोर्टासमोर वकील मनोज यांनी घटस्फोटाच्या मागणीसाठी आपली बाजू मांडली. या अर्जात त्यांनी स्पष्ट केलं होतं की, पत्नीला तिच्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी ही व्यक्ती पत्नीला घटस्फोट देत आहे. याचा स्वीकार करीत महिलेने न्यायालयात सांगितलं की, मी दुसऱ्यावर प्रेम करते आणि त्याच्यासोबत लग्न करू इच्छिते. दोन्ही पक्षांचं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज स्वीकार केला आणि दोघांना वेगळं होण्याचे आदेश दिले. हे ही वाचा-VIDEO : 'माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस?' मुंबई हायवेवर तरुणींमध्ये हाणामारी 2013 मध्ये झालं होतं लग्न मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचं लग्न 8 वर्षांपूर्वी झालं होतं आणि त्यांना 5 वर्षांची मुलगीदेखील आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला होता. यादरम्यान महिलेला दुसऱ्या तरुणासोबत प्रेम जुळलं. आणि महिलाने त्या तरुणासोबत लग्न करण्याची इच्छा प्रकट केली. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने ऐकलं नाही. शेवटी पत्नीला वाटतं की, त्याच्या पत्नीचा आनंद यातच आहे. म्हणून या व्यक्तीने पत्नीला घटस्फोट देऊन आपला अडथळा दूर केला व तिच्या लग्नाला परवानगी दिली.
First published:

Tags: Divorce, Indore News, Madhya pradesh, Marriage, Wife and husband

पुढील बातम्या