मुंबई, 03 : अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचं संकट अखेर मुंबईवरून टळलं आहे. मुंबईच्या दिशेनं कूच केलेल्या या वादळाची दिशा बदलली असून पनवेल, दापोली, नाशिक मार्गाने जाणार आहे. परंतु, अलिबागला धडकल्यानंतर या वादळाने ठिकठिकाणी धुमशान घातले आहे. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ किनारपट्टीला धडकले. वादळ धडकल्यानंतर ताशी 100 ते 120 किलोमीटर चक्रीकार वारे वाहून पाऊस पडत आहे. अलिबागवरून पुढे सरकत या वादळाने मुंबईच्या दिशेनं झेप घेतली. निसर्ग चक्रीवादळाचा केंद्रबिंदू Eye of Cyclone प्रथमच समोर आला. उरणजवळील दांडा इथं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.चक्रीवादळाचा हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या पोटात धडकी भरली.
निसर्ग चक्रीवादळाचा केंद्रबिंदू Eye of Cyclone... प्रथमच समोर आला समुद्रातून जमिनीवर धडकणाऱ्या वादळाचा VIDEO pic.twitter.com/5JCTN9IIjq
— News18Lokmat (@News18lokmat) June 3, 2020
अलिबागमध्ये चक्रीवादळ धडकल्यानंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे रस्त्यावर असलेल्या दुचाकीही उडून गेल्या.
अंगावर शहारे आणणारा हा थरारक व्हिडिओ गुजरातमधील पालीताना या परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये झाडावर वीज कशी कोसळते ते दिसत आहे.
Nisarga cyclone वीज कोसळून झाडाला आग, पाहा थरारक VIDEO pic.twitter.com/xxPwVxqFMR
— News18Lokmat (@News18lokmat) June 3, 2020
रोह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार बॅटिंग केली.
निसर्ग वादळाच्या प्रत्यक्ष तडाख्याअगोदरच सोसाट्याच्या वाऱ्यात मुंबईच्या मलबार हिल परिसरातल्या उंच इमारतीवरची शेड अशी उडून गेली
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यानं वरळी परिसरात मोठे झाडं उन्मळून पडली. तर उपनगरातही पावसाने दमदार हजेरी लावली.
VIDEO : मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यानं वरळी परिसरात मोठे झाडं उन्मळून पडलं
— News18Lokmat (@News18lokmat) June 3, 2020
निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं...वाऱ्याचा वेग वाढला pic.twitter.com/L1JgazXcJA
रत्नागिरीत मिऱ्या बंधाऱ्याजवळ सिमेंट घेऊन जाणाऱ्या मालवाहू जहाजाला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे हे जहाज समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकलं होतं.
संपादन - सचिन साळवे