इंदूर, 26 डिसेंबर : अवघ्या 3 रुपयात कुरिअरमधून पार्सल घेण्यासाठी मध्य प्रदेशातील (madhya Pradesh News) नागझिरीमधील एका व्यक्तीला 8 हजार रुपयांना चुना लागला आहे. सायबर फ्रॉडची ही नवी पद्धत बुरहानपूरमध्ये पाहायला मिळत आहे. शुभ खादीवाला याला एका नंबरवरुन कॉल आला होता. ज्यात त्या व्यक्तीने कुरिअर आल्याचं सांगितलं. जर तुम्ही मोबाइल नंबरवर पाठवलेली लिंक अॅक्टिव्ह कराल तर तुमच्या खात्यातून 3 रुपये जातील. मात्र तुम्ही लिंक अॅक्टिव्हेट केली नाही तर पार्सल परत पाठवला जाईल. ज्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल. तरुण म्हणाला, मला वाटलं तीन रुपयांत मिळतय पार्सल तरुणाला पार्सलमध्ये काय असेल याची उत्सुकताही होती. सोबतच केवळ 3 रुपयांत पार्सल मिळत असल्याने फक्त 3 रुपयांची गोष्ट असल्याने तरुणाने त्याकडे दुर्लक्ष केलं. यानंतर तरुणाने लिंक अॅक्टिव्हेट केली. त्याच वेळी मोबाइलवर 8 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. हे ही वाचा- भल्या पहाटे नदीकाठी नेत बापानेच 13 वर्षीय मुलाचा घोटला गळा, धक्कादायक कारण समोर या मोबाइल नंबरपासून राहा सावधान.. तरुणाला या 8274886674 मोबाइलवरुन फोन आला होता. आणि अन्य नंबर 9940570051 देण्यात आला होता. ज्यावर लिंक फारवर्ड करण्यास सांगण्यात आलं होतं. ज्यानंतर पैसे काढण्यात आले.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.