मराठी बातम्या /बातम्या /Viral /ऑनलाईन फसवणुकीचा नवीन फंडा; गुन्हेगारांनी एका ड्रायव्हरकडून भाड्यानं घेतली....

ऑनलाईन फसवणुकीचा नवीन फंडा; गुन्हेगारांनी एका ड्रायव्हरकडून भाड्यानं घेतली....

ऑनलाईन फसवणूक

ऑनलाईन फसवणूक

वेगानं डिजिटायझेशन होत असल्यामुळे आजकाल ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यासाठी गुन्हेगार विविध प्रकारच्या शक्कल लढवतात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 27 जानेवारी : वेगानं डिजिटायझेशन होत असल्यामुळे आजकाल ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यासाठी गुन्हेगार विविध प्रकारच्या शक्कल लढवतात. काही वेळा एसएमएसद्वारे तर काही वेळा बँकेच्या नावाचा वापर करून कॉलच्या माध्यमातून खातेदाराचे महत्त्वाचे पिन नंबर मिळवले जातात. आता तर काही गुन्हेगार फसवणुकीसाठी बँक खातंही भाड्यानं घेत असल्याचं उघड झालं आहे. मुंबईमध्ये अशी घटना समोर आली आहे. बोरिवली गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) एका 26 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली आहे. हा ड्रायव्हर ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना भाड्यानं बँक खाती पुरवत होता. 'मिड डे'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या कॅब ड्रायव्हरचं नाव शोभा मंडल असं आहे. मंडल हा मूळचा झारखंडचा असून सध्या तो धारावीत राहत होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीनं आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यानं मुंबईतील धारावी, माहीम आणि माटुंगा या परिसरांतील विविध बँकांमध्ये 16 हून अधिक खाती उघडल्याचं निष्पन्न झालं आहे.

  हेही वाचा - रुसलेल्या बॉयफ्रेंडसाठी मुलीनं लिहिलं हटके लव्ह लेटर, हसून हसून व्हाल लोटपोट

  जीआरपी अधिकारी गेल्या वर्षी जुलै महिन्यात नोंदवलेल्या एका ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करत होते. या प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तीनं विरार येथील रोशनसिंगची (वय 23 वर्षे) फसवणूक केली होती. बँक खातं केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं रोशनची 44 हजार रुपयांची फसवणूक झाली होती.

  रोशनसिंग एका विमा बँक कंपनीत काम करत होता. तो कांदिवली येथील कार्यालयात जात असताना त्याच्या मोबाईल फोनवर एक लिंक आणि एक मेसेज आला होता. 'बँक खातं केवायसी अपडेट करा नाहीतर खातं ब्लॉक केलं जाईल', असं या मेसेजमध्ये सांगण्यात आलं होतं. रोशनसिंगनं या लिंकवर क्लिक केलं आणि आवश्यक ते तपशील भरले. यानंतर त्याला एक ओटीपी मिळाला. जेव्हा त्यानं हा ओटीपी त्या लिंकमधील तपशीलासोबत भरला तेव्हा त्याच्या बँक खात्यातून 44 हजार 715 रुपयं डेबिट झाल्याचे दोन मेसेज मिळाले.

  आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सिंग यांनी बोरिवली जीआरपीकडे तक्रार नोंदवली, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

  या प्रकरणी आयटी अॅक्टसह आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या बँक खात्यात रक्कम ट्रान्सफर झाली होती त्या तपशीलांचा शोध घेतला असता ते तपशील कॅब ड्रायव्हर शोभा मंडल याचे असल्याचं निदर्शनास आलं. बँकेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे धारावी परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली.

  शोभा मंडलची शहरातील विविध बँकांमध्ये 16 खाती असल्याचं तापासात उघड झालं आहे. त्याने कबुली दिली आहे की, तो झारखंडमधील ऑनलाइन फसवणूक करणार्‍यांना आपली बँक खाती देत असे. या बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या रकमेपैकी 10 टक्के कमिशन त्याला मिळत असे.

  मंडल हा कॅब ड्रायव्हर म्हणून काम करायचा. अधिक पैसे कमवण्यासाठी तो फसवणूक करणाऱ्यांना त्याची बँक खाती देत असे. या कामाला तो आपला पार्ट-टाईम बिझनेस म्हणतो, पोलीस म्हणाले.

  आम्ही बँकेकडे मंडलच्या सर्व बँक खात्याचा तपशील आणि जमा केलेल्या व काढलेल्या रकमेचा तपशील मागितला आहे. मंडलला कोर्टात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असंही पोलीस म्हणाले.

  First published: