नवी दिल्ली, 26 जानेवारी : प्रेम हे आयुष्यातील खूप छान भाग असल्याचं म्हटलं जातं. आजपर्यंत आपण अनेक प्रेमाची वेगवेगळी उदाहरणे पाहिली आहेत. सोशल मीडियावरही अनेकजणांच्या लव्हस्टोरी व्हायरल होत असतात. अगदी लहान मुले मुलेही एकमेकांच्या प्रेमात असलेले दिसून येतं. काही असेही लोक आहेत जे प्रेमाच्या भरात काहीही करायला तयार असतात. सध्या एका मुलीने आपल्या रुसलेल्या बॉयफ्रेंडला मनवण्यासाठी एक लव्हलेटर लिहिलं आहे. सध्या हे लेटर सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं असून व्हायरल होत आहे.
इंटरनेटवर सध्या व्हायरल होत असलेलं लव्हलेटर वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. मुलीने चिडलेल्या बॉयफ्रेंडला शांत करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. मुलीनं तोडक्या मोडक्या हिंदीत लिहिले, जानू, मला तुझ्यावर शंका नाही. जानू, जेव्हा मी एखाद्या मुलीला तुझ्याशी बोलताना पाहते तेव्हा माझे मन दुखावते खूप जास्त. जानू, कोणत्याही मुलीशी बोलू नकोस. आणि कोणत्याही मुलीकडे पाहून हसू नकोस. जानू मी तुला चुकीचं नाही समजत पण जानू मी तुझ्यावर कूप प्रेम करते. जानू मी कबूतर तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव नाही तर नको ठेवूस. तू त्यांच्या घरी जाऊ नकोस मग तू मुलगी असो किंवा नसो. मुन्ना कबुतर माफ करताना मी काही चुकीचं लिहिलं असेल तर. ओके तन्नू. आय लव यू, आय लव यू. आय लव यू.
View this post on Instagram
मुलगी पुढे लिहिते, सॉरी सॉरी मुन्ना जर काही चुकीचं लिहिलं तर. माझं कबुतर, मुन्ना, जानु, राजा, रसगुल्ला, टमाटर. आय मीस यू, आय लव यू. हे व्हायरल होत असलेलं लव्ह लेटर The Adult Humour(TAH) या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. हे शेअर करत लिहिलं असी एखागी गर्लफ्रेंड तर मी पण डिजर्व्ह करतो. या पोस्टवर नेटकरी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
हे लव्ह लेटर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर अनेक मीम्स तयार केले जात आहे. मुलीने बॉयफ्रेंडला दिलेल्या कबुतर, मुन्ना, जानू, अशा हटके नावांवरुन या लव्हलेटरची मजा घेतली जात आहे. अनेकजण या प्रेमींना निब्बा निब्बी असल्याचे म्हणत आहेत. असं लव्ह लेटर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर तर असे अनेक प्रेमी पहायला मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Top trending, Viral, Viral news