काही चमत्कार वैद्यकीय क्षेत्रालाही कळत नाहीत. असाच एक चमत्कार लंडनमध्ये घडला. एका नवजात अर्भकाचं श्वसन चक्क 17 मिनिटं बंद होतं. म्हणजेच त्याची हृदयक्रिया 17 मिनिटांसाठी बंद झाली होती. डॉक्टरांनी आशा सोडल्या होत्या. कुटुंबीय तर धाय मोकलून रडत होते; मात्र आता ते बाळ सुखरूप आहे. 3 महिन्यांनंतर त्या बाळाला घरी सोडण्यात आलं आहे. बाळाची आई बेथानी होमर हिने ‘द मिरर’ या ब्रिटिश वृत्तपत्राला माहिती दिली, की 26 आठवडे आणि 3 दिवसांनंतर तिची इमर्जन्सी प्रसूती करावी लागली. या परिस्थितीत बाळ जिवंत राहण्याची शक्यता खूपच कमी होती. प्लासेंटल अबॉर्शन करावं लागल्यानं बाळाची परिस्थिती नाजूक होती. यात जन्माआधीच प्लासेंटा गर्भाशयापासून विलग होतो. बाळासाठी हे धोक्याचं असतं. तीन महिन्यानंतर बाळ घरी बाळाचा जन्म झाला, तेव्हा त्याचं वजन केवळ 750 ग्रॅम होतं. त्याचा श्वासोच्छ्वास 17 मिनिटं थांबला होता. त्यानंतर तो पूर्ववत झाला. जगवण्यासाठी बाळाला रक्तही द्यावं लागलं. शरीराचं स्कॅनिंग केल्यावर त्याच्या मेंदूला कोणतीही इजा झाली नसल्याचं समोर आलं. त्यामुळे बाळाला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले गेले. तब्बल 112 दिवस रुग्णालयात राहून आता ते बाळ घरी आलंय. अजूनही त्याला ऑक्सिजन लावावा लागतोय. “डॉक्टरांनी मला सांगितलं, की 17 मिनिटांनंतर बाळाला पुन्हा जीवनदान मिळालं. आणखी काही मिनिटं गेली असती, तर कदाचित भयंकर घडलं असतं,” असं बाळाच्या आईनं सांगितलं. हेही वाचा - श्वास कोंडला, हार्ट अटॅक आला! खरोखर भयावह ठरली Halloween Party; काय घडलं पाहा 5 VIDEO प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉक्टरांनी बेथानी हिला दोन शक्यता सांगितल्या होत्या. बाळाची परिस्थिती नाजूक असल्यानं एक तर पोटातच त्याचा मृत्यू होऊ शकतो किंवा जन्मानंतर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती. बाळ 17 मिनिटं श्वास घेऊ शकत नव्हतं, असं डॉक्टरांनी सांगितल्यावर विश्वास बसला नाही, असं बेथानीचं म्हणणं आहे. बाळाची घ्यावी लागणार काळजी बेथानीची प्रसूती खूप अचानक करावी लागली. 26 आठवड्यांपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं; मात्र त्यानंतर तिला अचानक पेटके येऊ लागले व रक्तस्रावही सुरू झाला. बाळाला आता घरी सोडलं असलं, तरी त्याला ऑक्सिजन लावावा लागत आहे. बाळाच्या हृदयाला एक छिद्र असून एक खुला व्हॉल्व्हही आहे. त्यामुळे बाळ मोठं होईपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. जन्मल्यावर 17 मिनिटं हृदयक्रिया बंद पडूनही बाळाला जीवदान मिळालं हा मोठाच चमत्कार म्हणावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.