जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video : जीव धोक्यात घालून चोरानी चोरली अशी गोष्ट पाहून म्हणाल, 'भाऊ तर D ग्रेड चोर निघाला'

Video : जीव धोक्यात घालून चोरानी चोरली अशी गोष्ट पाहून म्हणाल, 'भाऊ तर D ग्रेड चोर निघाला'

मजेदार चोरी कॅमेरात कैद

मजेदार चोरी कॅमेरात कैद

चोराने आपल्या जीवाची बाजीलावून अशी वस्तू चोरली की तुम्ही म्हणाल ‘अरे दादा… एवढी रिस्क कशाला?’ आता तुमच्या मनात आलं असेल की या चोरानं असं नक्की चोरलं तरी काय?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 जुलै : भारतात चोरी करणे अगदी सामान्य झालं आहे. कोणी पैसे चोरतं तर कोणी दागिने, कोणी मोबाईल चोरतं तर कोणी गाड्या. या सगळ्यात चोर आपल्या जीवावर खेळून आणि डोकं लावून लोकांना लुटताना किंवा चोरी करताना पाहिले गेले आहेत. यासंबंधीतचे अनेक व्हिडीओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल. पण सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत चोराने आपल्या जीवाची बाजीलावून अशी वस्तू चोरली की तुम्ही म्हणाल ‘अरे दादा… एवढी रिस्क कशाला?’ आता तुमच्या मनात आलं असेल की या चोरानं असं नक्की चोरलं तरी काय? Watch Video : चोरांनी तरुणीची चोरलेली बॅग का केली परत? नक्की त्यांनी असं काय पाहिलं? तर या चोरानं चोरलं कारवील एन्टिना… हो फक्त एका एन्टिनासाठी त्याने चोरी केली. ज्यासाठी तो पकडला गेला असता, तर त्याने मार देखील खाल्ला असता. आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बाईक चालवत असल्याचे तुम्ही पाहू शकता. तो चोर आहे असे अजिबात वाटत नाही. तो दुचाकीवर बसून रस्त्यावरून जात असतो. पण अचानक तो एका कारजवळ थांबतो. काही सेकंद तो असाच बाईकवर बसून राहतो चोरी करण्याची संधी शोधतो, त्यानंतर तो उठून पुढे जातो आणि मागे येतो. तो आजूबाजूला कुणी नाही ना याची खात्री करतो आणि थेट चोरी कारजवळ जातो.

जाहिरात

चोराला कारजवळ जाताना पाहून तुम्हाला वाटेल की आता तो कारचा दरवाजा उघेड आणि काही तरी मोठी गोष्ट करेल पण तर काही होत नाही. हा चोर हळू हळू गाडीजवळ आला आणि त्याच्यावरील अँटेना चोरू लागला. दुचाकी चोरीसाठी चोरींनी वापरली अनोखी शक्कल, संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद या चोराला असं अँटिना चोरताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे. हा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर thejusticmemes नावाच्या हँडलने शेअर करण्यात आला आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. काहींनी गंमतीने प्रश्न विचारला की या अँटिनाचं तो काय करेल? तर काहींनी म्हटलं की, तो आता आपल्या डोक्यावर अँटिना लावेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात