नवी दिल्ली 08 जून : लग्नातील अनेक अजब व्हिडिओ व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सध्या असाच एक लग्नातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये लग्नादरम्यान वराच्या कृत्यामुळे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबतची चर्चा रंगली आहे. व्हिडिओमध्ये नवरदेव आपल्या फोनमध्ये मग्न असल्याचं पाहायला मिळतं. तो पूर्णवेळ आपल्या फोनमध्येच पाहताना दिसतो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांकडून नवरदेवावर टीका तसंच त्याला नवरीबद्दल आदर नसल्याचं म्हणत नकारात्मक कमेंट केल्या जात आहेत. एका चर्चमधून हे जोडपं खाली जात असताना वधूने पाहुण्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. सगळ्यांची काळजीने विचारपूस केली. मात्र नवरदेवाच्या कृत्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. या पूर्ण वेळेत नवरदेव नवरीसोबत चालत असला तरी त्याचं पूर्ण लक्ष आपल्या फोनमध्येच होतं.
My body is here with you, but my mind is outside of town pic.twitter.com/IcC6jh4FWT
— Ngobeni (@Mahuntsu) June 2, 2023
यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी वराच्या कृतीबद्दल असंतोष आणि टीका व्यक्त केली. एका ट्विटर वापरकर्त्याने विनोदीपणे कमेंट केली, “माझं शरीर इथे तुझ्याबरोबर आहे, परंतु माझं मन दुसरीकडे आहे,” हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून 37 दशलक्षहून अधिक जणांनी पाहिला आहे.
दुसर्या वापरकर्त्याने कमेंट केली, “तो काय करत होता आणि तिला याचा काहीच त्रास का झाला नाही, हे मला खरोखर जाणून घ्यायचं आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “हे विचित्र आहे… अनादर करणारे आणि अपमानास्पद आहे.” आणखी एकाने कमेंट केली, की “तो माणूस एफएक्स किंवा क्रिप्टो व्यापारी आहे. ज्याचं पूर्ण लक्ष आपल्या पैशांवर आहे."